You are currently viewing कणकवलीत फ्लॅट चोरट्यांनी फोडला; 45 हजारांचा मुद्देमाल लंपास..

कणकवलीत फ्लॅट चोरट्यांनी फोडला; 45 हजारांचा मुद्देमाल लंपास..

कणकवलीत फ्लॅट चोरट्यांनी फोडला; 45 हजारांचा मुद्देमाल लंपास..

कणकवली

शहरातील कणकवली काॅलेज रस्त्यावरील डिचोलकर बिल्डिंग येथील डॉ. विकास एन. एम. यांच्या बंद असलेला फ्लॅट चोरट्यांनी फोडला. चोरट्यांनी हॉलमध्ये असलेल्या कपाटातील 15 हजार रुपये व 30,000 किमतीची सोन्याची चैन असा मिळून जवळपास 45 हजारांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना मंगळवारी सकाळी 9.15 वा. सुमारास उघडकीस आली.

विकास एन. एम. हे मुळ केरळ येथील असून ते येथील एका खासगी रुग्णालयात कार्यरत आहेत. डिचोलकर बिल्डिंगच्या दुसर्‍या मजल्यावरील फ्लॅटमध्ये राहतात. विकास सोमवारी रात्री 8.40 वा. सुमारास फ्लॅट कुलूपबंद करून रुग्णालयात निघून गेले. मंगळवारी सकाळी 9.15 वा. सुमारास घरी आलेल्या विकास यांनी पाहिले असता फ्लॅटची कडी उघडी दिसली. त्यांनी आतमध्ये जाऊन असता फ्लॅटमध्ये चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. घडल्या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर कणकवली पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक महेश शेडगे, सहाय्यक उपनिरीक्षक राजेश उबाळे, हवालदार विनोद सुपल आदी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. श्‍वनपथकाचे कर्मचारीही ‘मायलो’ नावााया श्‍वासनसह दाखल झाले. पथकाचे कर्मचारी अमित वेंगुर्लेकर, निखिल चव्हाण यांनी ‘मायलो’ला फ्लॅटमधील काही वस्तूंचा वास दिला. त्यानंतर ‘मायलो’ इमारतीबाहेर येऊन रस्त्यावर काहीसा फिरून माघारी परतला. दरम्यान, स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेंतर्गत ठसे तज्ज्ञांनीही घटनास्थळ गाठून ठसे घेतले. विकास यांनी फ्लॅटफोडीबाबत कणकवली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली अाहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल झाला अाहे. अधिक तपास कणकवली करीत आहेत.

WhatsApp Facebook

प्रतिक्रिया व्यक्त करा