You are currently viewing भराडी देवी सेवा मंडळाचा अनोखा उपक्रम..

भराडी देवी सेवा मंडळाचा अनोखा उपक्रम..

मसुरे सुपुत्र रुपेश दूखंडे यांच्या माध्यमातून अनाथ मुलांसाठी ऐरोली येथे मदत..

 

मसुरे :

 

भराडी देवी सेवा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष मसुरे गावचे सुपुत्र रुपेश दूखंडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून अनाथ मुलांसाठी काहीतरी चांगले काम करण्याच्या हेतूने जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य, कपडे आदि वस्तू जमा करून ही सर्व मदत मुंबई ऐरोली येथील रिधी सिद्धी ट्रस्ट येथे देण्यात आली आहे.

भराडी देवी सेवा मंडळाचा अनाथ मुलांसाठी छोटीशी मदत हा कार्यक्रम रिद्धी सिद्धी ट्रस्ट,ऐरोली येथे नुकताच यशस्वी पार पडला.

यासाठी असंख्य दानशुर हातांनी सढळ हस्ते मदत केली. यावेळी या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रुपेश लोखंडे यांनी बोलताना सांगितले की ज्यांनी आमच्या मंडळावर विश्वास ठेवून जी वस्तु किंवा रोख रक्कमेच्या माध्यमातुन मदत केली त्या सर्वाचे आभार आणि यापुढे अशाच प्रकारच्या निराधार लोकांसाठी, अनाथ मुलांसाठी जास्तीत जास्त आपल्या संस्थेच्या माध्यमातून मदत केली जाईल.

यावेळी मंडळाचे कार्याध्यक्ष श्री कृष्णा चौगुले, सचिव श्री संभाजी कणसे, खजिनदार श्री देवेंद्र चव्हाण, सल्लागार श्री दिनेश बांबळे, श्री अमोल दळवी,महेश साटम, गिरीश चिंदरकर, सतीश दुखंडे, शुभम कणसे, अरविंद घोगळे, ओमकार चव्हाण, संतोष साटम, चेतन परब तसेच मंडळाच्या महिला आणि लहान मुलांची उपस्थित होती. भराडी देवी सेवा मंडळ या संस्थेच्या माध्यमातून यापूर्वीही विविध निराधारांना अनेक अनाथ आश्रमांना अशा प्रकारची मदत केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three − 3 =