You are currently viewing छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबीराचे  पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते ६ मे रोजी उद्घाटन

छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबीराचे  पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते ६ मे रोजी उद्घाटन

सिंधुदुर्गनगरी 

 महाराष्ट्र शासनामार्फत कौशल्य रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग महाराष्ट्र राज्य आयोजित छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबीराचे आयोजन केले आहे.  हे शिबीर दिनांक ६ मे २०२३ रोजी सकाळी ९.३० वाजता श्री ईच्छापूर्ती गोविंद मंगल कार्यालय हॉल ओरोस फाटा आर.टी.ओ. ऑफीस जवळ ओरोस सिंधुदुर्गनगरी येथे होणार आहे. या शिबीराचे उद्घाटन मंत्री सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे.

            जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी तसेच त्यांच्या पालकांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे. कार्यक्रमासाठी १० वी १२ वी परीक्षेस प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांना उपस्थित राहण्यासाठी जिल्ह्यातील संबंधित शाळेतील, कॉलेज मधील प्राचार्य व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी ए. एस. मोहारे यांनी केले आहे.

            या शिबीरात दहावी व बारावी नंतर विद्यार्थ्यांना करिअरच्या संधी या विषयावर मार्गदर्शन महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. या शिबीरात दहावी व बारावी नंतरचे महाविद्यालयीन शिक्षण व अभ्यासक्रम, महाविद्यालयीन अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रीया, शैक्षणिक शिष्यवृती योजना व कर्ज योजनांची माहिती तसेच करिअर प्रदर्शिनी विषयी विविध क्षेत्रातील तज्ञ व्यक्ती मार्फत मार्गदर्शन केले जाणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा