*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा.सदस्य तथा लालित्य नक्षत्रवेल समूह प्रशासक लेखक कवी दीपक पटेकर लिखित अप्रतिम ललितलेख*
*पैसा झाला खोटा…!*
अरे वाह…! काय ऐटीत उभा राहिलास…? बरोबरच आहे म्हणा तुझं…आजकाल तुझाच तर भाव वधारलाय…बघावे तेव्हा जो तो तुझ्याच मागे पळत सुटतो… सारं काही विसरतो; अगदी स्वतःला सुद्धा…!
तू सुद्धा खूप हुशार, बेरकी आहेस… ज्याच्याकडे आधीच पुष्कळ पैसा असतो, त्याच्याकडेच जातोस… इतरांच्या मात्र पुढे पुढे पळत राहतोस…ते धावतात तुझ्या मागून वेड्यासारखे पण तू सहजासहजी कुणाच्या हाताला लागत नाहीस.
का रे असा वागतोस…? तुझ्या मागून लोकांनी फिरावं अशी तुझीच इच्छा असते का..? की, उगाच तुझ्या मोहात लोकांना पाडण्याचा तुला छंदच लागला..? तुला माहितेय ना…? जे जे कोणी तुझ्या मोहात, तुझ्या नादी लागलेत त्यांचं आयुष्य बरबाद झालं. तुलाच प्रिय मानून त्यांनी सगे सोयरे, नातेसंबंध, मित्र मैत्रिणी साऱ्यांपासून दुरावलेत… अरे स्वतःच्या आई बापाला सुद्धा लोक विसरलेत केवळ तुझ्याच नादात…! ज्यांनी तुलाच सर्वस्व मानले ते तर माणुसकी धर्म सुद्धा विसरले… अन् तू मात्र दिलदार असल्यासारखा कमरेवर हात घेऊन सर्व मजा पाहत उभा आहेस..!
आजपर्यंत प्रेम आंधळं असतं असं ऐकलं होतं… पण ते प्रियकराचं प्रेयसी वरचे…!
पण…
तू तर माणसाचं पैशांवरचं प्रेम सुद्धा आंधळं असल्याचं दाखवून दिलंस…
वाह! रे तरी लीला…!
तू जसा लोकांना फसवतोस, तसेच लोक सुद्धा तुझ्या नावाने दुसऱ्यांना फसवू लागलेत.
तू ऐकलंस का ते गाणे…
*”ये रे ये रे पावसा…तुला देतो पैसा…*
*पाऊस आला मोठ्ठा अन् पैसा झाला खोटा…”*
तूच जर लोकांना आशा दाखवून फसवलं नसतस तर लोकांनी असं कुणाला फसवलं असतं का..?
एकाने दुसऱ्याला फसवलं की दुसरा तिसऱ्याला फसवतो…
दुनियेची आजकाल हीच रित बनत चालली आहे.
अरे, तुझ्यामुळे अनेकांचे संबंध सुधारण्यापेक्षा बिघडलेलेच जास्त दिसतात.
खरंय ना…!
नात्यांमध्ये जेव्हा व्यवहार तुझ्याशी निगडित होतात… तेव्हा काही वेळ पाण्यावर तरंगणाऱ्या अन् नंतर जलसमाधी घेणाऱ्या कागदाच्या होडीसारखी नाती सुद्धा भिजलेल्या कागदासमान नेत्र ओलावतात… शब्दांना शब्द भिडतात तेव्हा ती डगमगतात… मध्येच कोलांटी उडी मारून एकदाची तुटून पडतात…पुन्हा कधीही एकमेकांचं तोंड देखील न पाहण्यासाठीच…!
तू ज्यांच्या हातात..खिशात..खात्यात विसावतोस…कित्ती भाग्यवान असतात रे ते…!
त्यांनी तुझा आनंद घेतला…धुंदीत राहिले की;
“ये पैसा बोलता हैं..!” असं म्हणतात तर कुणी…
“पैसा खुळखुळतो म्हणतात…!”.
अरे, पण तू बोलतही नाहीस आणि आवाज येणाऱ्या पैशांना कोणी विचारत देखील नाहीत ना…, किंमत तर रंगबिरंगी नोटांना असते…!
तरीही पैसा खुळखुळतो का म्हणतात..?
खरंच, तुझ्या वेडापायी लोक काय काय नावं ठेवतील सांगता येत नाही…
पण एक सांगू का…?
तुझ्यामुळे चांगली चांगली माणसे बदललीत रे…!
बदललीत म्हणजे त्यांची वृत्ती बदलली…स्वभाव बदलला…
त्यांच्यापाशी असलेला पुष्कळसा पैसा लोकांच्या नजरेत भरतो अन् मग गरजेसाठी कुणीतरी पैसा मागतील म्हणून आपल्या हृदया जवळच्या व्यक्तिलाही काहीजण ओळख दाखवायची सोडून देतात…!
…म्हणून कधीकधी तर वाटतं, तू माझ्यापाशी माझ्या गरजेपुरताच असावास… आणि माझ्यापेक्षाही एखाद्याला तुझी जास्त गरज असेल तर मायेने तू त्याच्या झोळीत जावून बसावास…!
त्यांचे आशीर्वाद सुद्धा तुझ्या एवढेच मोलाचे असतील ना…!
माझ्या लेखी तर तुझ्यापेक्षाही कुणीतरी मला दिलेल्या आशीर्वादांना किंमत आहे… कारण आशीर्वाद नातं जोडतात, स्नेह वृद्धिंगत करतात…आपुलकी, माणुसकी जपतात.
तू तर कष्ट केल्यावर कुठेतरी भेटशील…नशीब बलवत्तर असेल तर दहा रुपयांच्या लॉटरीवर सुद्धा घरात येऊन बसशील.
पण माया, प्रेम, स्नेह, जिव्हाळा, आपुलकी, माणुसकी अन् आशीर्वाद तुला भेट म्हणून देऊनही विकत भेटणार नाहीत.
तरीही लोकांना तुझ्या अस्तित्वाची एवढी घमेंड का रे असते..?
तुझ्या प्रेमापोटी दुसऱ्यासाठी
येतील का रे कुणाच्या डोळ्यात चार आसवे तुला मिळविण्यासाठी..?
पण तू नसलास तरीही माझ्या प्रेमापोटी नक्कीच ओघळतील गालावरून दोन आसवे मला निरोप देण्यासाठी…!
तू असाच उभा रहा तुझ्या मस्तीत… कधी कुणाची जिरवण्यासाठी…तर कधी कुणाच्या नशिबी मिरवण्यासाठी…!
मी मात्र जपत राहतो माणुसकी; तू असल्याचं अन् नसल्याचंही शक्य न बाळगता….कायमच…!
*© दीपक पटेकर {दीपी}*
#८४४६७४३१९६
*संवाद मीडिया*
*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘
*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*
🥜 *आमची उत्पादने*🥜
*🔹 शेंगदाणा तेल🔹 खोबरे तेल*
*🔹 तीळ तेल🔹 करडई तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप🔹देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒
*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*
*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*
*अधिक माहितीसाठी संपर्क*
*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*
*🌎 www.sunandaai.com*
*✉️ sunandaaikrushi@gmail.com*
*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*
*जाहिरात लिंक*
———————————————-
*संवाद मिडिया*
☕☕☕☕☕☕☕☕☕
*_आता नवीन जागेत नवीन तजेल्यासह…._*
*_☕सलगर चहाची चव आता चाखता येणार आमच्या नवीन जागेत…._☕*
*_🫖 सलगर अमृततुल्य चहा_*🫖
*सावंतवाडी*
*_🏬सावंतवाडी चिटणीस नाका येथे नव्या दालनात ग्राहकांच्या तत्पर सेवेसाठी पुन्हा हजर…!☕_*
*_चहाला वेळ नसते…! पण वेळेला चहा हा हवाच…!_*☕
*_चहाबरोबरच आम्ही घेऊन आलो आहोत उन्हाळ्यातल्या गारव्यासाठी…_*🧊🧊
*🥛मसाला ताक*
*🍋लिंबू सरबत*
*_आता सलगर चहा बरोबरच गारेगार मसाला ताक व लिंबू सरबत……_*
*_त्यासाठी आमच्या नव्या दालनात एकदा अवश्य भेट🏃♂️ द्या…_!*
*🎴आमचा पत्ता:-*
*_बस स्थानक रोड, रेणुका हॉटेल समोर, चिटणीस नाका, सावंतवाडी_*
*📲संपर्क:- ९४२३८७८७४०*
*जाहिरात लिंक*
———————————————-