You are currently viewing तिसरीमाळ  श्री चंद्रघंटा….

तिसरीमाळ श्री चंद्रघंटा….

श्री चंद्रघंटा….

पिंडजप्रवरारूढl चंड कोपास्त्र कैरयुक्ता l प्रसादनं तनुते मह्यन चन्द्रघंटेती विश्रुता l
भगवती दुर्गामातेच्या तिसऱ्या शक्तीचे स्वरूप चंद्रघण्टा होय. नवरात्रीचा तिसरा दिवस तिला अर्पण केला आहे.
चंद्रघंटा देवीच्या ललाटावर चन्द्र शोभयमान असल्यामुळे, दुर्गादेवीच्या या स्वरूपाला चंद्रघण्टा हे नाव देण्यात आले आहें.हे रूप परम शांतीदायक आणि कल्याणकारी आहें. हिचा वर्ण सुवर्णासमान चमकदार आहें. देवीचे वाहन सिंव्ह आहें. देवीच्या गळ्यात पांढऱ्या फुलांची माळ आहें. देवीला दश भुजा आहेत.
नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून नित्यकर्म आटोपून सूर्याला अर्ध्य द्यावे, त्यानंतर व्रताचा संकल्प करावा व पूजन करावे. पूजा करताना पिवळी किंवा सोनेरी रंगाची वस्त्रे परिधान करावी. पांढऱ्या रंगाच्या मिठाईचा नैवेदय अर्पण करावा. खीर, बर्फी चं आवर्जून वापर करावा. या शिवाय देवीला मध अर्पण करावा.
भुतलावर धर्माचे रक्षण आणि अंधःकार दूर करण्यासाठी चंद्रघण्टा देवी प्रकट झाली. या देवींची आराधना, उपासना,केल्याास आध्यात्मिक व आत्मिक शक्ती प्राप्त होते. तिसऱ्या दिवशी दुर्गा शक्ती पठणा मुळे उपासकांनाा यश, प्रगती, कीर्ति, मान, सन्मान प्राप्त होऊ शकतात असे सांगितले आहें. या दिवशी देवीचे जे साधक आहेत त्यांचे मन मणी चक्रा मध्ये प्रवेश करते. त्यांना अलौकिक अशा वस्तूंचे दर्शन होते. दिव्य, सुगंधी अशा सुवासाचा प्रत्यय येतो. विविध दिव्य ध्वनी त्यांना ऐकायला येतात. देवींची उपासना करताना पुढील मंत्र म्हणतात.
या देवी सर्व भूते्षु, माँ चंद्रघण्टा रूपेन संस्थिता l
नमस्तंसै य, नमस्तंसै, नमस्तंसै नमो नमः ll
आजचा रंग निळा
आजची माळ.. दुर्वा व झेंडू
कल्पना तेंडुलकर
ओरोस.

प्रतिक्रिया व्यक्त करा