You are currently viewing शब्दांचा हिंदोळा फुलवी आनंदाचा मळा

शब्दांचा हिंदोळा फुलवी आनंदाचा मळा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा.सदस्य कवी गझलकार जयराम धोंगडे यांनी “शब्दांचा हिंदोळा” या सुमिता सबनीस पाठक लिखित काव्यसंग्रहाचे केलेले रसग्रहण*

शब्दांचा हिंदोळा फुलवी आनंदाचा मळा

“झुले बाई झुला, माझा झुले बाई झुला
आता होता भुईवर, भेटे आभाळाला”

या पाडगावकरांच्या कवितेची आठवण येते. कधी कल्पनांच्या, मधुर स्वप्नांच्या साम्राज्यात हा झुला आभाळाला भिडतो, तर कधी वास्तवाचं भान आल्यावर जमिनीवर येऊन आदळतो ते कळत नाही. मानवी मन म्हणजे जणू एक झुलाच आहे. ते सदैव हिंदोळे घेत राहतं… कधी भुईवर, कधी आकाशी, कधी सागराच्या खोल तळाशी… जे वैरीही चिंतणार नाही ते मन चिंतू शकतं! त्यात कवी मनाचे तर काही विचारूच नका.

‘जे न देखे रवी, ते देखे कवी’ म्हणतात. त्यात स्त्री मनाची संवेदना, तिचे भावविश्व अनेक हिंदोळ्यावर स्वार झालेलं असतं.. सौ.सुमिता सबनीस-पाठक अशीच एक संवेदनशील, हळव्या मनाची कवयित्री आपल्या भावना व्यक्त करताना लिहून जाते…

“पाहते मी कैकदा नजरेस त्या
जीव वेडा का झुराया लागला”

किंवा

“कधी काळी तुझ्यासाठी जगावे वाटले होते
मला ना वेगळी केंव्हा कधी मी वाटले होते”

सहज सुंदर या भावना पण मनाला भिडतात. सौ. सुमिताजींचा हा पहिलाच काव्यसंग्रह पण तो पहिलाच असावा वाटत नाही. सहज, साध्या, सोप्या भाषेत लय, नाद आणि शब्दमाधुर्याने त्यांनी काव्यमळा फुलविला आहे.

कोरोनाने माणसाला माणसाची नव्याने ओळख करून दिली. त्याला त्याच्या मर्यादांची जाणीव झाली. परंतु कोरोना काळात माणूस माणसाला भिऊन दूर पळू लागला. कोरोनाच्या जिवाणूंचा संसर्ग… त्याची दहशत, मानवाची झालेली वाताहत… हा जीवनातला वेडावाकडा हिंदोळाच! त्या भावना व्यक्त करताना सुमिता पाठक लिहितात…

“केलेत घाव सारे माझ्याच माणसांनी
घायाळ पाहता मज पळतात माणसे ही”

माणसांची जात हावरी… एक तीळ सात जणांनी वाटून खायचा काळ कधीच कालशेष झाला आहे. ‘पानफुटी’सारखी स्वार्थी भावना हल्ली संधी मिळताच आपली पाळेमुळे तिथे घुसवित आपला पसारा वाढवताना दिसते आहे. ‘संतुष्टी’ शब्द कोशबाह्य होतो आहे. हे चित्र उभे करतांना पाठक बाईंना ‘शेर’ सुचतो…

“नाही जागा परडी मध्ये
फुले का तरी खुडते आहे?”

‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ हा निसर्ग नियम! पण माणसांनी माणसांशी माणसाप्रमाणे वागावे ही मानवी संस्कृती… पण माणूसच माणसाकडून जेंव्हा ओरबाडून घ्यायला लागतो तेंव्हा तो विकृतीकडे आकृष्ट झालेला असतो. आपल्याच माणसाकडून जेंव्हा आपला असा विश्वासघात होतो, दगाफटका केला जातो तेंव्हा आपल्याच पापण्यांना आपल्याच आसवांचा भार होतो. सौ. सुमिता म्हणतात…

“पापण्यांच्या या कडांना आसवांचा भार होतो
भेटतो मग शेर जेंव्हा वेदनेला मांडते मी”

कवयित्री शब्दांच्या हिंदोळ्यावर स्वार आहे. काव्याच्या दोरीने हा झुला विचाराच्या फांदीला बांधला आहे. चारोळ्या, अष्टाक्षरी, अभंग, गझला, मुक्तछंद असे स्वैर झोके घेत कवयित्री झुलते आहे. तिच्या रचना सर्वव्यापक आहेत. अनेक विषयाला ती हात घालते. शेतात राबणारा बाप आठवला की लिहिते…

“पोरावाणी जपतोया
जसं पोटचाचं पोरं
बापा मोहा रातदिस
कापसाच्या माग म्होरं”

तर कधी बापाला रुतणारा काटा… त्या काट्याने दिलेल्या वेदना… पण दुःख कष्टकऱ्यांच्या पाचवीलाच पूजलेलं असतं याची जाणीव असणारी सबनीस ताई काट्याला दोष देत नाही…

“माहित काय काट्या
कोणास बोचला तो
स्वधर्म जाणुनी हा
बघ वेदनाच देतो”

गझला, कविता, चारोळ्या, मुक्तछंद अशा काव्याच्या नानाविध विधा हाताळताना, आपल्याच भावविश्वात रममाण होऊन अर्थपूर्ण, आशयघन आणि लयबद्ध रचनेच्या शृंखलेत भावपूर्ण अभंगाचीही गुंफण सुमिताजींनी केली आहे.

“न दुःखवी जना । शब्दांच्या वेदना ।।
झाल्या जरी मना । मार्ग नसे ।।”

तब्बल ६८ रचनांनी सजलेला हा ‘शब्दांचा हिंदोळा’ रसिक वाचकांना नक्की झुलवत ठेवणारा असाच आहे. श्री विष्णू थोरे यांनी सजवलेलं आकर्षक मुखपृष्ठ व त्यांचीच प्रस्तावना, निर्मल प्रकाशनाची पुस्तक बांधणी आणि छपाई, नांदेडच्या जेष्ठ साहित्यीका नि कवयित्री आशा पैठणे यांची पाठराखण लाभलेला हा काव्यसंग्रह नक्कीच दर्जेदार आणि वाचनीय झाला आहे.

माझी भगिनी सौ. सुमिता सबनीस-पाठक हिचं या निमित्ताने मी कौतुक आणि अभिनंदन करतो आणि पुढील दमदार साहित्यिक वाटचालीसाठी अगदी मनःपूर्वक शुभेच्छा देतो!

जयराम धोंगडे, नांदेड
(९४२२५५३३६९)

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆

काव्यसंग्रह : शब्दांचा हिंदोळा
कवयित्री : सुमिता सबनीस पाठक
प्रकाशक : निर्मल प्रकाशन, नांदेड
पृष्ठये: ८० / मूल्य: ₹ १२५/-

 

*संवाद मीडिया*

*🎊सुवर्णसंधी..!!🎊सुवर्णसंधी..!!🎊 सुवर्णसंधी..!!🎊*

*🪙अक्षयतृतीयेच्या शुभमुहूर्तावर🥳 हक्काचे घर खरेदी🏡 करणार्‍या ग्राहकांना👥सुवर्णसंधी…!!🎊*

*🛣️कुडाळ येथील प्रसिध्द छत्रपती शिवाजी पार्क🌆 मध्ये फ्लॅट🏢 बूक करा🏷️आणि मिळवा 🤗तब्बल 2️⃣ लाखाच्या वस्तू🛍️*

*_🛣️कुडाळ शहराच्या🌆 मध्यभागी सर्व सुविधांनी 🤗युक्त फ्लॅट 🏢घेण्याचे स्वप्न पुर्ण करा..!!🤩_*

*🔸३२ इंची एलईडी टीव्ही🖥️*
*🔹विंडो एसी सी वन टन🥶*
*🔸सिंगल डोर फ्रीज🚪*
*🔹टीव्ही युनिट📺*
*🔸फाईव्ह सीटर सोपासेट🛋️*
*🔹थ्री डोर कपबोर्ड👚*
*🔸क्वीन साईज बेड🛏️*
*🔹क्वीन साइज मॅट्रेस विथ पिलो🧽*
*🔸 सेंटर टेबल🪑*
*🔹शु रॅक👟*
*🔸फोटो फ्रेम 5 qty🖼️*

*_👉…आणि बरंच काही…!!🥳_*

*🛑विशेष टिप:- हि ऑफर फक्त अक्षयतृतीये दिवशीच बुकिंग करणाऱ्या ग्राहकांसाठी आहे..!!_*

*🎴आमचा पत्ता-:*
*छत्रपती शिवाजी पार्क*
*_सत्कार हॉटेल रोड, जुना बसस्टॉप समोर, कुडाळ_*

*📲संपर्क:-*
*७०३८२८१२३४ / ९४२२३७९३९९*
*९४२२०६५१८१ / ९४०४७५१५००*

*जाहिरात लिंक*

———————————————-

 

प्रतिक्रिया व्यक्त करा