You are currently viewing भावनांना रफू करू या ना….

भावनांना रफू करू या ना….

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य लेखिका कवयित्री प्रा.सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

भावनांना रफू करू या ना….

भावनांना रफू करू या
चला भावनांना रफू करू या ना…

जखमा येती जखमा जाती
किती प्रकारे किती त्या “जाती
पण हाती काही नाही ना…
भावनांना रफू करू या ना
प्रेम आहे द्वेष आहे राग संताप आहे ना …
भावनांना रफू करू या ना…

जाऊन जाणार कोठे
अहो त्याच विहिरी नि पाणवठे
त्याच गाई म्हशी गळ्यातलीही ठुशी
नार झाली जरी वेडी पिशी
बदलणार काहीच नाही ना!
भावनांना रफू करू या ना …

रक्त पिपासू समाज हा
देणार नाहीच न्याय चिरडणार
किती युगे नारी अजून कुढणार
माहीत नाही ना ..
भोगवाद येथिल संपणार नाही ना…
भावनांना रफू करू या ना …

रफू एक उपाय नामी
दडवण्या फाटलेले
कळते सारेच साऱ्यांना
हे आहे उसवलेले
फक्त करण्या मनाचे समाधान
देखावा करू याना …
भावनांना रफू करू या ना…
भावनांना रफू करू या ना…

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
दि : २६/४/२०२३
वेळ : रात्री १०/४५

*संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल🔹 खोबरे तेल*
*🔹 तीळ तेल🔹 करडई तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप🔹देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*

*जाहिरात लिंक*

———————————————-

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × two =