You are currently viewing गाऊ किती महती

गाऊ किती महती

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*गाऊ किती महती*

 

विचारांची अभिव्यक्ती

होते आपल्या भाषेतून

शब्दांच्या माध्यमातून

संवाद….

 

माझ्या मराठीची

आहे गोडी अवीट

ठसा अमीट

मनावर…

 

कवने भारुडे

सरिता संत साहित्याची

झुळझुळते निर्मळाची

ज्ञानधारा…

 

अनेक उपभाषा

मराठीत आहेत रूढ

मनावर गारूड

ऐकताना….

 

अभिमान भाषेचा

आपण नित्य जपावा

दूर करावा

न्यूनगंड….

 

मराठी भाषा

बावनकशी आहे सोनं

भूषवावं आदरानं

कंठात…..

 

पडता रडता

मराठी येते मुखात

आईच पदरात

घेते….

 

लिपी भाषा

सौजन्याला नसे तोड

रसाळ गोड

मराठी…..

 

घरोघरी जपावा

मराठी शब्दांना मान

मराठीचे स्थान

अत्युच्च…..।।

 

 

अरुणा दुद्दलवार@✍️

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × three =