You are currently viewing सोनवडेपार वराड पुलाच्या कामाची खा. विनायक राऊत, आ. वैभव नाईक यांनी केली पाहणी

सोनवडेपार वराड पुलाच्या कामाची खा. विनायक राऊत, आ. वैभव नाईक यांनी केली पाहणी

*जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत काम पूर्ण करण्याच्या ठेकेदार व अधिकाऱ्यांना दिल्या सक्त सूचना*

खासदार विनायक राऊत यांनी सातत्याने पाठपुरावा करून सरंबळ सोनवडेपार वराड रस्त्यावर वराड येथे मोठे पूल मंजूर करून घेतले आहे. मात्र सी.आर. झेड. च्या तांत्रिक अडचणीमुळे हे काम रेंगाळले होते.त्यासाठी देखील खा. विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांनी पाठपुरावा करून काम सुरु करून घेतले. आज या पुलाच्या कामाची पाहणी खा.विनायक राऊत, आ वैभव नाईक यांनी अधिकाऱ्यांसोबत केली.ठेकेदार व अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना करत जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पुलाचे काम पूर्ण करण्याच्या सक्त सूचना ठेकेदार व अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.रस्त्याच्या कामांमुळे माडाच्या झाडांचे नुकसान होणार आहे त्यासंदर्भात देखील नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली.
यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय पडते, प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे सहाय्यक अभियंता श्री. माळगावकर,किशोर भगत, आपा आळवे, हरिश्चन्द्र पवार, अनिल परब, सोमा परब, वराड सरपंच शलाका रावले, किशोरी भगत, शिवाजी चव्हाण, गोपाळ परब, राजू घाडी, आपा परुळेकर, अशोक परब, अमित आंबेकर, बाळा गावडे, कमलाकर परब, विनोद आळवे,बाबू टेंबुलकर आदींसह वराड येथील शिवसैनिक उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × 3 =