You are currently viewing लोखंडी गेट अंगावर पडून मालवणात एकाचा मृत्यू

लोखंडी गेट अंगावर पडून मालवणात एकाचा मृत्यू

मालवण :

मालवण तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे खैदा येथील भारत गॅस गोडाऊन ठिकाणी गोडाऊन किपर असलेले बुलाजी (भाई) चंद्रकांत चव्हाण वय ४० रा. कातवड यांच्या अंगावर लोखंडी गेट पडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी रात्री ९ : १५ वाजण्याच्या सुमारास घडली.

बुलाजी चव्हाण हे गेली अनेक वर्षे त्या ठिकाणी कामास होते. गुरुवारी रात्री गोडाऊन कंपाऊंडचे लोखंडी गेट बंद करीत असताना लोखंडी गेट त्याचे अंगावर पडून त्यात त्यांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्याबाबत संस्थेचे व्यवस्थापक दिनेश पांडुरंग ढोलम यांनी मालवण पोलीस स्टेशन येथे माहिती दिली. त्यानुसार आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. मालवण पोलीस निरीक्षक विजय यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचनामा करून पुढील कार्यवाही केली.

दरम्यान बुलाजी यांच्या मृत्यूची माहिती मिळताच नातेवाईक व मित्रपरिवार घटनास्थळी उपस्थित झाले. काही काळ वातावरण संतप्त बनले होते. पोलीसही दाखल झाले होते. अखेर संघाच्या वतीने तात्काळ ५ लाख मदत देण्याचे लेखी पत्र नातेवाईकांना देण्यात आले. अशी माहिती पोलिसांच्या वतीने देण्यात आली आहे.

बुलाजी यांच्या अकाली मृत्यूनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांना भजनाची आवड होती. परिसरात भाई बुवा म्हणून ते ओळखले जात. गावातील धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांचा उत्स्फूर्त सहभाग असायचा. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, भाऊ, वहिनी, पुतणे असा परिवार आहे. कोळंब ग्रामपंचायत सदस्य यशवंत चव्हाण यांचे ते बंधू होत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

10 + 10 =