डिंगणे ग्रुप ग्रामपंचायत निवडणुकीत सौ.आरोही गवस बिनविरोध…

डिंगणे ग्रुप ग्रामपंचायत निवडणुकीत सौ.आरोही गवस बिनविरोध…

बांदा

डिंगणे ग्रुप ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत गावविकास पॅनेलच्या सौ.आरोही गवस या बिनविरोध निवडून आल्या आहेत. शिवसेना शाखाप्रमुख अमित गवस यांच्या पत्नी सौ.आरोही गवस यांची गावविकास पॅनेलमधून ग्रामपंचायत सदस्यपदी बिनविरोध निवड झाली आहे.

गावविकास पॅनेलमधून बिनविरोध निवडून आलेल्या सौ.आरोही गवस यांचे माजी पालकमंत्री आ.दीपक केसरकर यांनी भेट घेत त्यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या. यावेळी तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, बांदा ग्रामपंचायत सदस्य तथा शिवसेना शहरप्रमुख साईप्रसाद काणेकर यांच्यासह ग्रामस्थ व गावविकास पॅनेलचे सदस्य उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा