इचलकरंजी:
इचलकरंजी महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाकडून आयोजित करण्यात आलेल्या इचलकरंजी प्रज्ञाशोध परीक्षेचा बक्षीस वितरण समारंभ महानगरपालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख,माजी उपनगराध्यक्ष प्रकाश मोरबाळे,नगरसचिव विजय राजापुरे,प्रशासनाधिकारी सौ.नम्रता गुरसाळे यांच्या हस्ते अत्यंत उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक या प्रज्ञाशोध परीक्षेचे प्रमुख राजेंद्र घोडके यांनी केले.सौ नम्रता गुरसाळे यांनी परीक्षा आयोजनामागील हेतूचे कथन केले.आयुक्त सुधाकर देशमुख यांनी आपल्या भाषणातून मुलांना स्पर्धा परीक्षेसाठी प्रोत्साहित केले.अत्यल्प परीक्षा फी घेऊन आयोजित केलेल्या या परीक्षेचे कौतुक ही त्यांनी केले. भविष्यात या परीक्षेतील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना महापालिकेमार्फत शिष्यवृत्ती देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले. प्रकाश मोरबाळे यांनीही बक्षीसपात्र विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.या परीक्षेला इयत्ता पहिली ते चौथीचे 4116 विद्यार्थी बसले होते.चार बहुपर्यायी उत्तरे असणाऱ्या शंभर मार्कांच्या प्रश्नपत्रिका प्रत्येक इयत्तेसाठी होत्या.परीक्षा निकोप वातावरणात पार पडावी म्हणून प्रत्येक परीक्षा केंद्रावर केंद्र निरीक्षक नेमले गेले होते.त्याच दिवशी संध्याकाळपर्यंत शहराचा संपूर्ण निकाल पूर्ण करण्यात आला होता.त्यातील 655 गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना शिल्ड व प्रमाणपत्र देऊन आज गौरवण्यात आले.यावेळी केंद्र संचालक,केंद्र निरीक्षक व परीक्षा कमिटी सदस्य यांचाही सत्कार करण्यात आला.कार्यक्रमासाठी शिक्षक समितीचे अध्यक्ष संजय देमाण्णा,सर्व मुख्याध्यापक,शिक्षक व पालक खूप मोठ्या संख्येने उपस्थित होते. पाल्याच्या आनंदामध्ये सहभागी होण्यासाठी पालक व विद्यार्थी यांना सेल्फी पॉइंट उपलब्ध करून दिला होता.हा सेल्फी पॉईंट आजच्या कार्यक्रमाचा आकर्षण बिंदू ठरला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.रेखा परीट मॅडम यांनी तर आभार प्रदर्शन आनंदा कोदले सर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अलका शेलार, श्रीकांत सोलगे, अनिल रावळ, सुमन मगदूम,गौस पटेल यांनी विशेष परिश्रम घेतले.
संवाद मीडिया*
*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘
*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*
🥜 *आमची उत्पादने*🥜
*🔹 शेंगदाणा तेल🔹 खोबरे तेल*
*🔹 तीळ तेल🔹 करडई तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप🔹देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒
*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*
*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*
*अधिक माहितीसाठी संपर्क*
*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*
*🌎 www.sunandaai.com*
*✉️ sunandaaikrushi@gmail.com*
*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*
*जाहिरात लिंक*
———————————————-