You are currently viewing गांधीपेठ तालीम मित्रमंडळाच्या पुरस्कारांचे वितरण

गांधीपेठ तालीम मित्रमंडळाच्या पुरस्कारांचे वितरण

*गांधीपेठ तालीम मित्रमंडळाच्या पुरस्कारांचे वितरण*

पिंपरी

गांधीपेठ तालीम मित्रमंडळाच्या वतीने चिंतामणी, क्रांतिवीर आणि जिजाऊ या पुरस्कारांचे वितरण रविवार, दिनांक ३० एप्रिल २०२३ रोजी करण्यात आले. चापेकर स्मारक उद्यान, चापेकर चौक, चिंचवड येथे विधानपरिषद आमदार उमा खापरे, ज्येष्ठ समाजसेवक गिरीश प्रभुणे, सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर आणि गांधीपेठ तालीम मित्रमंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ गोलांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.

श्रीक्षेत्र भंडारा डोंगर येथे जगद्गुरू तुकोबारायांचे भव्य मंदिर साकार व्हावे म्हणून कार्यरत असलेल्या ह. भ. प. साहेबराव तथा बाळासाहेब काशीद यांना चिंतामणी पुरस्कार, वयाच्या साठीनंतर शंभरपेक्षा जास्त धावण्याच्या मॅरेथॉन शर्यती जिंकणारे तसेच तीन आंतरराष्ट्रीय स्पर्धाविजेते खेळाडू हरिश्चंद्र थोरात यांना क्रांतिवीर चापेकर पुरस्कार आणि सुमारे पन्नास वर्षांपासून चिंचवड येथे नाममात्र दरात वैद्यकीय सेवा प्रदान करणाऱ्या डॉ. पुष्पा कलमदानी यांना जिजाऊ पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

याप्रसंगी उमा खापरे यांनी, “पिंपरी – चिंचवड या औद्योगिकनगरीला सांस्कृतिकनगरी म्हणून ओळख मिळाली आहे, या गोष्टीचा खूप आनंद होतो!” अशा भावना व्यक्त केल्या. पुरस्काराला उत्तर देताना पुरस्कारार्थींच्या वतीने बाळासाहेब काशीद यांनी, “हा पुरस्कार म्हणजे तुकोबांचा आशीर्वाद आहे!” अशी कृतज्ञता व्यक्त केली.

गांधीपेठ तालीम मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी संयोजनात परिश्रम घेतले. विजय बोत्रे यांनी सूत्रसंचालन केले. नाना जाधव यांनी आभार मानले.

– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२

 

*संवाद मिडिया*

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*

प्रतिक्रिया व्यक्त करा

6 + 1 =