You are currently viewing भाजपा तर्फे वेंगुर्ले तालुक्यातील पोलिस पाटीलांचा कोरोना योद्धा म्हणून गौरव..

भाजपा तर्फे वेंगुर्ले तालुक्यातील पोलिस पाटीलांचा कोरोना योद्धा म्हणून गौरव..

वेंगुर्ला

वेंगुर्ले तालुक्यातील १८ पोलिस पाटीलांचा कोरोना योद्धा म्हणून जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. भाजपतर्फे हे आयोजन करण्यात आले होते.
गाव पातळीवर महसूल, पोलिस प्रशासन आणि ग्रामस्थ यामधील महत्त्वाचा दुवा म्हणून पोलिस पाटील कार्यरत असतात. गावातील तंटे मिटवुन गावात शांतता व सलोखा ठेवण्याचे काम पोलिस पाटील करत असतात. कोरोना काळात कोणत्याही मार्गदर्शक सुचना व सुरक्षा नसतानाही आपला जिव धोक्यात घालून दिवस – रात्र काम पोलिस पाटीलांनी केले .परंतु त्या कामाची दखल ना शासनकर्त्यांनी केली वा कुठल्या राजकीय पक्षाने केली.

कोरोना काळात शासकीय कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी काम नाकारले परंतु पोलिस पाटीलांनी आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावले म्हणूनच भाजपा वेंगुर्ले च्या वतीने पोलिस पाटीलांना कोरोना योद्धा म्हणून गौरवण्यात येत असल्याचे प्रतिपादन जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केले. पोलिस पाटील हे शासकीय कर्मचारी नसल्याने त्यांना फक्त मासिक मानधन मिळते. परंतु पोलिस पाटीलांना शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही, तो लाभ मिळवून देण्यासाठी शासनस्तरावर भाजपा मार्फत प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. तसेच पोलिस पाटीलांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांच्या सदैव पाठीशी रहाण्याचे अभिवचन जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी दिले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

17 + fourteen =