You are currently viewing संस्कारक्षम विद्यार्थी घडविणे हेच खरे आव्हान ! – विकास सावंत

संस्कारक्षम विद्यार्थी घडविणे हेच खरे आव्हान ! – विकास सावंत

गुणवंत विद्यार्थी, पालकांचा सन्मान

 

सावंतवाडी :

सद्याचे युग हे अत्यंत स्पर्धेचे युग आहे. स्पर्धेत टिकण्यासाठी प्रत्येक व्यक्ती जीवाचे रान करतांना दिसतो. अशावेळी आजच्या एकंदरीत धावपळीत आणि बाहेरच्या प्रचंड कलुषित वातावरणात आदर्श अशा संस्कारक्षम विद्यार्थी घडविणे हेच शिक्षक, पालक यांच्यासाठी खरे आव्हान आहे, असे प्रतिपादन शिक्षण प्रसारक मंडळ, सावंतवाडीचे संस्थाध्यक्ष विकास सावंत यांनी केले.

सावंतवाडीतील राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, सावंतवाडी आयोजित इयत्ता दहावी व बारावी मधील गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळा प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विकास सावंत होते. यावेळी व्यासपीठावर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव व माजी मुख्याध्यापक व्ही. बी.नाईक, शालेय समिती अध्यक्ष प्रा. डॉ. दिनेश नागवेकर, खजिनदार सी. एल. नाईक व संस्था सदस्य अमोल सावंत, चं. मु. सावंत, संदीप राणे, प्रा. सतीश बागवे, माजी मुख्याध्यापिका सोनाली सावंत आदी उपस्थित होते.
दरम्यान, मान्यवरांच्या हस्ते एस.एस.सी परीक्षेत उत्तीर्ण झालेले अनुक्रमे वर्धा तानाजी सावंत, आदिती दिनेश चव्हाण, समीर मयुरेश पटवर्धन, अमृता मनोज बिले, राहुल झिलू गावडे, मयुरेश मंदार पटवर्धन, तेजस देवदास कोरगांवकर, सिद्धार्थ सुधाकर आडेलकर, सिद्धी एकनाथ उपरकर, मयुर मोहन पवार, अक्षय हरिश्चंद्र बंड, सानिया भालचंद्र सबनीस, शत्रुघ्न दिलीप नाईक, सिद्धी संतोष राऊळ, रसिका वारंग, पर्जन्य सावंत तर एच. एस. सी परीक्षेत कला शाखेतून अनुक्रमे वैष्णवी श्रीपाद डेगवेकर, ईशा चंद्रशेखर प्रभू, यशदा शरद शिरोडकर, विज्ञान शाखेतून अनुक्रमे दिशा राजेश गुडेकर, युगा विष्णू देसाई, सिद्धी रामचंद्र मांजरेकर, वाणिज्य विभागातून गायत्री सुजित कोरगांवकर, मानसी रघुनंदन माळकर, दर्शन दिगंबर सामंत, मार्केटिंग अँड रिटेल मॅनेजमेंटमधून ओजस विनायक परब, अक्षता सिताराम गावडे, सना इम्तिहाज शेख तर कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजीमधून अनुक्रमे भिकाजी राजन केदार, न्हानू मोहन सावंत, अनिकेत दाभोळकर याबरोबर वेगवेगळ्या विषयात विशेष प्रावीण्य मिळवलेले विद्यार्थी मानसी माळकर, युगा देसाई, श्रीराम वालावलकर, सोनम ढवळे, दीपिका राऊळ, ईशा प्रभू, रोहित कालवणकर या गुणवंतांना पालकांसोबत पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक जगदीश धोंड म्हणाले की, प्रतिकूल परिस्थितीतही माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षकांनी भरपूर कष्ट घेतले. या कष्टाला विद्यार्थी व पालकांनीदेखील साथ दिली. आपल्या प्रशालेच्या परंपरेला साजेसे यश संपादित केले, असे सांगून प्राध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, पालक यांचे कौतुक करून अभिमान व्यक्त केला.
विद्यार्थ्यांमधून मनोगत व्यक्त करताना ईशा प्रभू आणि दिशा गुडेकर यांनी आपल्याला मिळालेले यशाचे श्रेय प्राध्यापक, शिक्षक, पालक आणि प्रशालेतील अनेक भौतिक सुखांनीयुक्त आनंदमय वास्तूला दिले. पालकांमधून मनोगत व्यक्त करताना माजी पोलीस निरीक्षक तेजल शिरोडकर यांनी विद्यार्थ्यांमध्ये शिक्षकांनी व पालकांनी जिद्द निर्माण करणे गरजेचे आहे. हे माझ्या मुलीने व शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांकडे बघून या प्रशालेतील सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये जिद्द आणि आत्मविश्वास निर्माण केले, हे दिसून येते. असे सांगून माझी मुलगी या प्रशालेत शिकली याचा मला अभिमान वाटतो, असे सांगितले. त्याचबरोबर मुलांना सोने-चांदी देण्यापेक्षा भरभरून पुस्तके द्यावीत, असा संदेश पालकांना दिला. त्याचबरोबर प्राध्यापक, शिक्षक यांच्यासोबत विशेषत: संस्थेचे अध्यक्ष विकास सावंत व पदाधिकाऱ्यांचे देखील नेतृत्व, पालकांना केलेले सहकार्य याचे कौतुक केले.

पालक म्हणून दिनेश चव्हाण यांनी संस्थेचे अध्यक्ष विकासभाई यांनी आपल्या नेतृत्वातून नावाला साजेसे सर्वच शैक्षणिक स्तरावर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण परिपूर्ण विकासासाठी प्रयत्नशील आहेत, असे आपल्या मनोगतातून सांगितले. कार्यक्रमाला उपमुख्याध्यापक एस.पी.नाईक व माध्यमिक विभागाकडील सर्व शिक्षक, उच्च माध्यमिक विभागाकडील सर्व प्राध्यापक, विद्यार्थी व पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्या प्रा. सुमेधा नाईक यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.प्रीती सावंत, प्रा. दशरथ शृंगारे, प्रा. मिलिंद कासार यांनी तर आभारप्रदर्शन पर्यवेक्षक ए.व्ही. साळगावकर यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 − two =