You are currently viewing डिंगणे येथील संतोष नाईक यांची आत्महत्या अनाधिकृत माती उत्खनन प्रक्रियेत सहभाग घेतल्यामुळे; मुलींचा जबाब

डिंगणे येथील संतोष नाईक यांची आत्महत्या अनाधिकृत माती उत्खनन प्रक्रियेत सहभाग घेतल्यामुळे; मुलींचा जबाब

मयत नाईक यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा; तालुका कोतवाल संघटनेची तहसीलदार यांच्याकडे मागणी

सावंतवाडी

तालुक्यातील डिंगणे येथील कोतवाल सहकारी कै. संतोष राजाराम नाईक यांची आत्माहत्या ही अनाधिकृत माती उत्खनन प्रक्रियेत सहभाग घेतल्यामुळे टोकाची भुमिका घेतली असा जबाब त्यांच्या मुलींनी दिला आहे.

अशाप्रकारे दिवसेंदिवस दहशतीच्या वातावरणात काम करणे अत्यंत कठीण बनले आहे. याबाबत संबंधित मयत कै. संतोष राजाराम नाईक यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा अशी मागणी तालुका कोतवाल संघटनेच्या वतीने आज तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली.

यावेळी सावंतवाडी तालुका कोतवाल संघटना अद्यक्ष लियाकत बेग, सदस्य तुषार वालावलकर, गणेश गोसावी, बंड्या नाईक, अर्चना दळवी, गंगाराम शेळके, दिलीप सावंत, काशीराम जाधव, सुनील जाधव, लाडू गावडे, उल्हास पार्सेकर, विष्णू वेंगुर्लेकर, श्वेता गावडे, विनोद धुरी आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 − 1 =