You are currently viewing मा.आम. प्रमोद जठार वाढदिवस अभिष्टचिंतन

मा.आम. प्रमोद जठार वाढदिवस अभिष्टचिंतन

 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेली दीड दोन दशके राजकीय धुरांदरात ज्यांचं नाव आवर्जून घेतलं जातं असे एक नाव म्हणजे मा.आम.प्रमोद जठार…! मुंबईतील लालबाग येथे राहणारे आणि कॉलेजच्या जीवनापासून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक म्हणून ओळखले जातात. पहिल्याच वर्षी ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लालबाग विभाग नगर कार्यवाह झाले. पुढे संघाच्या योजनेतून १९८८-९२ पर्यंत लालबाग भाग प्रमुख म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली. मुंबईत त्यांनी जनता बँकेत १४ वर्षे नोकरी केली तर काही काळ पुण्यातही नोकरीनिमित्त राहिले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते असल्याने देवगड वैभववाडी हा कित्येक वर्षे स्व.आप्पा गोगटे यांची पर्यायाने भाजपाचे हुकूमत असलेला मतदारसंघ त्यांना भाजपाने बहाल केला. नाम.नारायण राणे यांचे विश्वासू काँग्रेस कार्यकर्ते रवींद्र फाटक यांचा अवघ्या ३४ मतांनी पराभव करून त्यांनी स्व.आप्पा गोगटे यांचा मतदारसंघ भाजपाकडे राखला होता. २००९-१४ पर्यंत देवगड वैभववाडी मतदारसंघाचे आमदार म्हणून त्यांनी प्रतिनिधित्व केलं. नारायण राणे यांचे सुपुत्र आम.नितेश राणे यांनी पुढील विधानसभा निवडणुकीत जठार यांचा पराभव केला. परंतु नारायण राणे यांचा भाजपामध्ये प्रवेश झाल्यानंतर मात्र दोहोंमध्ये अतिशय चांगले संबंध बनल्याचे पहायला मिळाले. आम.नितेश राणे यांच्यावर जिल्हा बँक निवडणुकीच्या वेळी हल्ल्याचा आरोप झाला तेव्हा प्रमोद जठार ठामपणे त्यांच्या पाठीशी राहिले आणि विरोधी शिवसेनेवर त्यांनी टीकास्त्र सोडले होते. एकवेळचे राणेंचे कट्टर विरोधक असलेले प्रमोद जठार राणेंच्या वर आलेल्या संकटाच्या वेळी मात्र राणेंच्या पाठीशी उभे असल्याचे दिसून आले.

भाजपा सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष म्हणूनही त्यांनी उत्कृष्ट काम केले होते. सहा वर्षे त्यांनी जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी पेलली होती. सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमांवर होणाऱ्या ग्रीन रिफायनरी प्रकल्पाला पाठिंबा दर्शवित जिल्ह्यातील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न केले. परंतु रिफायनरी प्रकल्पाला विरोध झाल्यानंतर त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. आपल्या निर्णयावर ठाम असणारे लोकप्रतिनिधी म्हणूनही प्रमोद जठार यांची ख्याती आहे. राजकीय कारकीर्द यशस्वी करतानाच २०१४ – १९ पर्यंत ते जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) वर विश्वस्त, कोकण पर्यटन महामंडळाचे उपाध्यक्ष म्हणूनही कार्यरत होते. सध्या ते भाजपचे प्रदेश चिटणीस म्हणून काम पाहत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजप नावापुरतीच होती त्यावेळी शांत संयमी आणि अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून स्व.आप्पा गोगटे यांना ओळखले जायचे. परंतु त्यानंतर मात्र कोकणातील भाजपाचे आक्रमक व अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून प्रमोद जठार यांच्याकडे प्राधान्याने पाहिले जाते.

प्रमोद जठार यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई- गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाला चालना देण्यासाठी विशेष प्रयत्न केले होते. आज हा महामार्ग पूर्णत्वास गेलेला आपण पाहत आहोत. निवास व न्याहारी योजनेसारखा पर्यटनाला चालना देणारा प्रकल्प अधिक व्यापक व्हावा यासाठी त्यांनी विविध संकल्पना आणल्या. कोकणात पर्यटन सारखा व्यवसाय मार्गी लागत असतानाच कोकणातील युवकांसाठी अत्यंत महत्त्वाचा समजला जाणारा प्रश्न म्हणजे रोजगार, आणि हा रोजगाराचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रमोद जठार यांनी विविध माध्यमातून अनेकदा प्रयत्न केले. असे सर्वसामान्यांसाठी झटणारे लोकप्रतिनिधी माजी आमदार प्रमोद जठार यांचा आज वाढदिवस…! *संवाद मीडियाकडून त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि भावी वाटचालीसाठी सदिच्छा..!*💐💐

प्रतिक्रिया व्यक्त करा

14 + one =