You are currently viewing आदरांजली…!!

आदरांजली…!!

*प्रा.दिलीप सुतार, कुरुंदवाड यांनी हुतात्मा दिनी वाहिलेली आदरांजली*

 

*आदरांजली…!!!*

 

त्यांना कधीच मृत्यू येत नसतो

जे चालत असतात

जन्मापासून अखेरच्या श्वासापर्यंत

केवळ सत्याच्याच मार्गावरून

*सत्य हाच ईश्वर* हा अखंड ध्यास घेऊन…

 

त्यांची कधीच हत्या होत नसते

जे हिंसेच्या अन् द्वेषाच्या

घोंघावणा-या वादळातही…

निश्चल उभे असतात…

फक्त अहिंसेची अभेद्य ढाल आपल्या हाती घेऊन…

 

कोणताही हुकूमशहा…

किंवा साम्राज्यवादी विचार

करू शकत नाही बंद

त्यांची बुलंदवाणी…

ज्यांच्या ओठावर असतात

फक्त मानवतेचीच गाणी…

 

कोणताही हातोडा किंवा घण

फोडू शकत नाही त्यांचे पुतळे

जे स्वत:च्या जगण्यालाच बनवितात…

एक वैश्विक एकात्मतेची प्रार्थना

अन् ज्यांच्या प्रत्येक आचार विचारांत

अन् डोळ्यांत असते…

आपल्या समर्थकांसाठी…

अन् विरोधकांसाठी सुद्धा…

अपार प्रेम,करूणा अन् सदभावना…!!!

 

प्रा.दिलीप सुतार

कुरूंदवाड

मो.नं 9552916501

प्रतिक्रिया व्यक्त करा

16 − 1 =