You are currently viewing जमिनीवर प्रेम करणारा कवी माणूस

जमिनीवर प्रेम करणारा कवी माणूस

*जमिनीवर प्रेम करणारा कवी माणूस :*
*बबन सराडकर**
==============
येत्या १९ तारखेला अमरावतीचे सुप्रसिद्ध कवी डॉ . बबन सराडकर यांच्या ” *आवरसावर”* ह्या कविता संग्रहाचे प्रकाशन होत आहे .खरं म्हणजे आज खऱ्या अर्थाने कविता लिहिणाऱ्या आणि आपल्या मातीशी इमान राखणाऱ्या कविवर्य बबन सराडकरांच्या दृष्टीने महत्त्वाचा दिवस .बबनरावांचा माझा परिचय झाला तो कवितेमुळे.मी १९७४ या वर्षाला अमरावतीच्या विदर्भ महाविद्यालया मध्ये प्रवेश घेतला आणि जीवन ज्योती या प्रातिनिधिक कवितासंग्रहाची घोषणा केली .अनेक कवी त्या निमित्ताने मला भेटले .त्यामध्ये एक नाव होते बबन सराडकर यांचे.अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्याच्या सीमेवर राहणारा व करजगाव या गावाला वास्त्यव्य करणारा हा कवी.भेट झाली त्याच वेळेस हा कवी सशक्त असल्याचे मला जाणवले .मी त्या काळात पूर्ण ऊर्जेमध्ये होतो. माझ्या कविता माझे लेख अमरावतीच्या वर्तमानपत्रांमध्ये नियमितपणे छापून येत होते .बबनराव त्यामानाने ग्रामीण भागात राहणारा बराचसा अबोल अशा प्रवृत्तीचा पण आपल्या मातीशी इमान राखणारा माणूस मला या निमित्ताने गवसला .या पन्नास वर्षाच्या कालावधीमध्ये मी जेव्हा त्या आणि माझ्या मैत्रीचे सिंहावलोकन करतो तेव्हा मला असं जाणवते की माझ्या आयुष्यामध्ये जे काही लोक आले त्यामध्ये बबन सराडकरांचे स्थान बरेच वरचे आहे. या माणसाने कधीही आयुष्याशी तडजोड केली नाही .जे सत्य आहे ते स्वीकारले आणि जे सत्य आहे जे अनुभवले आहे तेच कवितेमध्ये मांडण्याचा प्रयत्न केला. उगीच काहीही लिहायचे यमक जुळवायचे प्रसिद्धीसाठी कुठलाही मार्ग अवलंबायचा याचा त्यांनी कधी स्वीकार केला नाही .त्यांचा तो स्वभावही नाही आणि समाजात काही माणसे अशी असतात की जी कदाचित फारशी लोकाभिमुख नसतील .फारशी प्रसिद्धीच्या शिखरावर नसतील .परंतु त्यांनी काव्य लेखन करताना आपल्या मातीशी इमान राखले असते आणि त्या इमान राखणाऱ्या एका कवीचे नाव आहे बबन सराडकर .
बबनरावाना शेतीचा व्यासंग होता .त्यामुळे त्यांनी त्यांचे बीएससीचे शिक्षण मधातच सोडून दिले आणि पूर्ण वेळ शेती करण्यावर त्यांनी भर दिला .शेती आपली आई आहे. या आईचे संगोपन व्यवस्थित केले तर ती आपले पण संगोपन व्यवस्थित करेल हे समीकरण त्याने बांधले होते .परंतु या समीकरणाला प्रत्यक्ष व्यवहारांमध्ये आणि व्यवहार न समजणाऱ्या बबनरावावांना मात्र धक्के बसले. परंतु तरीही हा माणूस त्यातून सावरला आणि आज विदर्भामध्ये बबन सराडकरांच्या नावाचा आगळावेगळा नावलौकिक आहे. तो त्यांनी जोपासलेल्या काव्यप्रेमामुळे. प्रतिनिधिक कविता संग्रहामुळे मी आणि बबन सराडकर एकत्र आलो आणि त्यातून साहित्य संगम या साहित्य संस्थेचा १९७६ ला उदय झाला. आम्ही दोघांनी मिळून झेप हा प्रतिनिधिक काव्यसंग्रह काढला. त्याला सुप्रसिद्ध कवी प्रा.मधुकर केचे यांनी सोळा पानाची प्रस्तावना लिहिली.
साहित्य संगम या संस्थेने आपला एक कालखंड चांगल्या रीतीने गाजवला. त्याला कारणही तसेच होते. तत्कालीन सगळी ज्येष्ठ साहित्यिक मंडळी साहित्य संगममध्ये होती त्यामध्ये सुरेश भट, मधुकर केचे, डॉ.भाऊ मांडवकर, बाबा मोहोड, सुदाम सावरकर, शरदचंद्र सिन्हा या सर्वांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल .या सर्वांच्या पाठबळामुळे आणि आमचे पितामह डॉ. मोतीलाल राठी यांच्या आर्थिक सहकार्यामुळे आम्ही साहित्याच्या क्षेत्रामध्ये खूप उंच भरारी घेऊ शकलो. बबन सराडकर देखील सुरवातीला बराच काळ या संस्थेचे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते .बबनरावांनी ज्या कविता लिहिल्या त्या अनुभवनिष्ठ आहेत .शेतकऱ्यांची असो स्वतःच्या जीवनातील असो समाजात आलेल्या अनुभवाचे प्रतिबिंब त्यांच्या कवितेमध्ये पडताना दिसते आणि त्यांची शब्द फेक मांडणी या सर्वच बाबतीत त्यांची कविता सरस आहे हे निर्विवाद सत्य आहे .कुठलीही कविता अशी ओढून काढून लिहिलेली आढळण्याचे काही कारण नाही. कारण कवी स्वतःशी तेवढा प्रामाणिक आहे हे त्यांचे काव्यवाचन करताना आपल्याला पदोपदी आढळून येते .आज त्यांच्या कवितासंग्रहाचे प्रकाशन होते आहे .मी सध्या गुजरातमध्ये आहे .पण जेव्हा मला निमंत्रण मिळाले तेव्हा मी लगेच त्यांचे चिरंजीव श्यामलला मी कार्यक्रमाला येत आहे असा निरोप पाठवला आणि तसे आरक्षण तातडीने करून घेतले .बबन सराडकरांचे अजून एक वैशिष्ट्य हे म्हणावे लागेल हे त्यांनी त्यांच्या चिरंजीवावर चांगले संस्कार केले. आज श्यामल चांगला डॉक्टर बरोबर चांगला कवी पण आहे .चांगला लेखक आहे .चांगला वक्ता आहे. चांगला गायक आहे .चांगला चित्रकार आहे .एवढे चांगले गुण त्याच्या ठिकाणी आहेत .त्याला कारण आमचे बबन सराडकर आहेत. त्यांनी मुलांवर चांगले संस्कार केले. त्यामुळे श्यामल आज चांगल्या लोकप्रिय दैनिकांमध्ये सदर चालवतो .चांगल्या बैठकीमध्ये आपल्या गाण्याने लोकांना मोहिनी घालतो .त्याचप्रमाणे आपला क्रिकेट असो गाणे असो चित्र असो या सर्वांच्या बाबतीत आघाडीवर आहे .बबन सरांडकरांचा हा जो कविता संग्रह प्रकाशित होत आहे .त्याला मुखपृष्ठ चित्र देखील श्यामलनेच काढले आहे.परवा मी रिजनल कॉलेज ऑफ इंजीनियरिंग मध्ये एका कार्यक्रमाला गेलो. परतताना मी आठवणीने बबन सरांडकरांना फोन केला .ते त्या महाविद्यालयाच्या जवळपासच राहतात आणि आठवणीने त्यांच्या भेटीला गेलो .तेव्हाच या पुस्तकाच्या समारंभाचा उहापोह झाला .श्यामलने व बबनरावांनी मला पुस्तकाचे मुखपृष्ठ दाखवले आणि बबनने आवर्जून सांगितले श्यामलने ते काढलेले आहे. मुलांनो सुसंस्कार करणे ही देखील फार मोठे जबाबदारी आहे आणि ती बबनरावांनी व वर्षावहिनींनी अतिशय व्यवस्थितपणे पार पाडली आहे असे श्यामलला पाहिल्यानंतर वाटते .बबनरावांची कविता जसजशी घडत गेली त्या सगळ्या घटनांचा मी साक्षीदार आहे .कारण तेव्हाचा काळ असा होता की माझी नोकरी अमरावतीच्या श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालयात आणि बबनरावांचे राहणे गाडगे नगरात आणि त्यांच्याच घरी आम्ही साहित्य संगमतर्फे सार्वजनिक वाचनालय पण सुरू केले होते .त्यांचे घर म्हणजे साहित्य संगमचे कार्यालय झाले होते .कोणताही कार्यक्रम असो. कवी संमेलन असो की साहित्य संमेलन असो मी आणि बबनराव सोबतच असायचो .अगदी बार्शीला झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये आम्ही दोघेजण प्रा. मधुकर केचे सरांसोबत गेलो होतो. असा हा बबन सरांडकरांचा काव्य प्रवास. या काव्य प्रवासाला आज त्यांचे कवितासंग्रहाच्या निमित्ताने मूर्त स्वरूप येत आहे. आमच्यासारख्या बबनरावांवर प्रेम करणाऱ्या लोकांना ही खरोखरच आनंदाची गोष्ट आहे .बबनरावांनी अशाच उत्साहात कविता लिहित राहाव्या आणि रसिकांना तृप्त करीत जावे अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. ============== प्रा *. डॉ.नरेशचंद्र काठोळे* संचालक मिशन आयएएस अमरावती महाराष्ट्र 9890967003

 

संवाद मिडिया*

*गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आपल्या हक्काचे घर बुक करा*

*🏬 देवगिरी हाइट्स 🏬*
*आठ मजली भव्य प्रकल्प…*

*1 BHK & 2 BHK फ्लॅट्स*

*🏤”दर्पण कन्स्ट्रक्शन”*
*🏚️सावंतवाडी🌳*

*घेऊन आले आहेत…! अगदी 🏞️नरेंद्र डोंगराच्या🌳 कुशीत…! प्रसिद्ध माठेवाडा🛕 परिसरात*

*🏬 देवगिरी हाइट्स 🏬*
*आठ मजली भव्य प्रकल्प…*

*📲 अधिक माहितीसाठी संपर्क साधा :-*👇
*9890968845 / +918379896943*

*🏠ऑफिस :- 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग*

*🌐Advt Web link*

———————————————

_______________________________
*संवाद मीडिया*

*🎊सुवर्णसंधी..!!🎊सुवर्णसंधी..!!🎊 सुवर्णसंधी..!!🎊*

*🪙अक्षयतृतीयेच्या शुभमुहूर्तावर🥳 हक्काचे घर खरेदी🏡 करणार्‍या ग्राहकांना👥सुवर्णसंधी…!!🎊*

*🛣️कुडाळ येथील प्रसिध्द छत्रपती शिवाजी पार्क🌆 मध्ये फ्लॅट🏢 बूक करा🏷️आणि मिळवा 🤗तब्बल 2️⃣ लाखाच्या वस्तू🛍️*

*_🛣️कुडाळ शहराच्या🌆 मध्यभागी सर्व सुविधांनी 🤗युक्त फ्लॅट 🏢घेण्याचे स्वप्न पुर्ण करा..!!🤩_*

*🔸३२ इंची एलईडी टीव्ही🖥️*
*🔹विंडो एसी सी वन टन🥶*
*🔸सिंगल डोर फ्रीज🚪*
*🔹टीव्ही युनिट📺*
*🔸फाईव्ह सीटर सोपासेट🛋️*
*🔹थ्री डोर कपबोर्ड👚*
*🔸क्वीन साईज बेड🛏️*
*🔹क्वीन साइज मॅट्रेस विथ पिलो🧽*
*🔸 सेंटर टेबल🪑*
*🔹शु रॅक👟*
*🔸फोटो फ्रेम 5 qty🖼️*

*_👉…आणि बरंच काही…!!🥳_*

*🛑विशेष टिप:- हि ऑफर फक्त अक्षयतृतीये दिवशीच बुकिंग करणाऱ्या ग्राहकांसाठी आहे..!!_*

*🎴आमचा पत्ता-:*
*छत्रपती शिवाजी पार्क*
*_सत्कार हॉटेल रोड, जुना बसस्टॉप समोर, कुडाळ_*

*📲संपर्क:-*
*७०३८२८१२३४ / ९४२२३७९३९९*
*९४२२०६५१८१ / ९४०४७५१५००*

*जाहिरात लिंक*

———————————————-

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × one =