You are currently viewing बाल स्नेही गाव संकल्पांतर्गत कलमठ ग्रामपंचायतचा शालेय मुलांसाठी समर कॅम्पचे आयोजन 

बाल स्नेही गाव संकल्पांतर्गत कलमठ ग्रामपंचायतचा शालेय मुलांसाठी समर कॅम्पचे आयोजन 

कणकवली

बाल स्नेही गाव असलेल्या कलमठ ग्रामपंचायतच्या वतीने दिनांक २६ व २७ एप्रिल रोजी मोफत समर कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. २ दिवस चालणाऱ्या या कॅम्प मध्ये अनेक उपक्रम आणि हस्तकला व इतर मार्गदर्शन तज्ञ कंरणार आहेत. हा कॅम्प रूपाली रिसॉर्ट येथे होणार आहे. यात कलमठ गावात राहणाऱ्या मुलांनाच सहभाग घेता येणार आहे. ५ वी ते ७ वी पर्यंतच्या मुला, मुलींना यात भाग घेता येणार आहे.धमाल मस्ती करण्याची संधी आणि खूप वेगवेगळ्या पद्धतीचे ज्ञान आत्मसात करण्याची संधी या समर कॅम्प मुळे मुलांना मिळणार आहे.
यामध्ये संगीत संवाद- संगीत विशारद प्रियंका मुसळे, रंगरेषा -कला शिक्षक प्रवीण चिंदरकर, हनुमत तांबट सर, क्राफ्टिंग – हरिश्चंद्र सरमळकर, स्वसरंक्षण- भालचंद्र कुलकर्णी, अभिनय ,संवाद कौशल्य, व्यक्तिमत्व विकास- नीलेश पवार सीने अभिनेते,योगा प्रशिक्षण- प्रमोद लिमये,हस्ताक्षर मार्गदर्शन- अभिजीत राणे सर,मातीकला-कृष्णा गोठनकर, नृत्य प्रशिक्षण- एसके डांस अकादमी, स्वच्छता विषयक जनजागृति व संवाद- संदिप पवार, स्वच्छ भारत मिशन अश्या तज्ञ मार्फत मार्गदर्शन मिळणार असून २० एप्रिल पर्यंत नाव नोंदणी करावी व अधिक माहिती साठि श्रीकांत बुचड़े ९४०५७१२८९३ , प्रमोद पवार ९४२१२६६७५१ यांच्याशी संपर्क साधावा आणि नाव नोंदणी करावी असे आवाहन ग्रामपंचायत कलमठच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

seventeen − 9 =