You are currently viewing कणकवली नगरवाचनालयातील विविध साहित्य प्रकाराचे प्रदर्शन

कणकवली नगरवाचनालयातील विविध साहित्य प्रकाराचे प्रदर्शन

कणकवली

कणकवली नगर वाचनालयातील नवीन खरेदी केलेल्या विविध साहित्य प्रकाराचे प्रदर्शन नगर वाचनालयाच्या वाचक कक्षामध्ये आयोजित केलेले आहे. सदर प्रदर्शन शनिवार १९ नोव्हेंबर व रविवार २० नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ९ ते १ व दुपारी ३ ते ६ या वेळेत सर्वांसाठी खुले असणार आहे.


पुस्तक प्रदर्शनाच्या कालावधीत म्हणजेच दुसया दिवशी सायंकाळी ५ वाजता याच सभागृहात रसिक वाचकांचा एक वाचक मेळावा आयोजित केलेला आहे. या मेळाव्यात वाचकांनी आपल्याला आवडलेल्या पुस्तकाविषयी व एकूणच वाचन व्यवहाराविषयी चर्चा करावी असे अपेक्षित आहे. परिसरातील रसिक वाचकांनी या मेळाव्यात सहभागी व्हावे असे आवाहन नगर वाचनालयातर्फे करण्यात येते आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा