You are currently viewing मिसळ महोत्सव देवगडच्या पर्यटन वाढीसाठी: आ नितेश राणे

मिसळ महोत्सव देवगडच्या पर्यटन वाढीसाठी: आ नितेश राणे

मिसळ महोत्सव देवगडच्या पर्यटन वाढीसाठी: आ नितेश राणे

देवगड मध्ये होणारा मिसळ महोत्सव हा पर्यटन वाढीला पूरक ठरेल यातून पर्यटकांचे पाय देवगड येथे स्थिरावतील देवगड मध्ये व्यापार उद्दीम वाढावा व पर्यटक यावेत यासाठी मी सतत प्रयत्न करतोय हा आयोजित केलेला महोत्सव त्याचाच एक भाग आहे असे मत आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केले

आमदार नितेश राणे यांनी देवगड येथे मिसळ महोत्सवाचा शुभारंभ केला यावेळी ते बोलत होते माजी आमदार अजित गोगटे, जिल्हा उपाध्यक्ष बाळ खडपे, प्रकाश राणे तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर डॉक्टर अमोल तेली संदीप साटम, देवगड जामसांडे शहर भाजपाचे अध्यक्ष योगेश पाटकर युवा सेलचे शहराध्यक्ष दयानंद पाटील माजी नगराध्यक्ष प्रणाली माने, योगेश चांदोसकर, माजी उपनगराध्यक्ष उमेश कनेरकर देवगड जामसंडे नगरपंचायतीचे गटनेते शरद ठुकरुल सर्व नगरसेवक देवगड अर्बन बँकेचे अध्यक्ष सदा ओगले, वैभव कळंगुटकर व्हीसी खडपकर वैभव बिडये मिलिंद माने यावेळी उपस्थित होते

यावेळी बोलताना भाजप हा काम करणारा पक्ष आहे तो जय विजय पराजय पाहत नाही सतत जनतेसाठी काम करत राहणे हा भाजपाचा गुणधर्म आहे असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले या महोत्सवाचा फीत कापून त्यांनी शुभारंभ केला व प्रत्येक मिसळ स्टॉलला भेट देऊन माहिती घेतली व त्यांना शुभेच्छा दिल्या संध्याकाळी अभिजीत कोसंबी यांचा सदर सदाबहार गाण्यांचा कार्यक्रम रंगणार आहे यावेळी उपस्थितांसमवेत आमदार नितेश राणे यांनी मिसळीचा आस्वाद घेतला

प्रतिक्रिया व्यक्त करा