You are currently viewing माजी विद्यार्थी अलंकार पाताडेचा कासार्डे विद्यालयाच्यावतीने गुणगौरव

माजी विद्यार्थी अलंकार पाताडेचा कासार्डे विद्यालयाच्यावतीने गुणगौरव

तळेरे

कासार्डे माध्यमिक विद्यालयाचा माजी विद्यार्थी कु.अलंकार प्रवीण पाताडे याचा कासार्डे विद्यालयाच्या वतीने इ.५वी ला असताना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे, पूर्व उच्च प्राथमिक परीक्षेतील घवघवीत यश संपादन केल्याबद्दल व शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत स्थान पटकाविल्या बद्दल कासार्डे शिक्षण संस्थेचे स्थानिक व्यवस्था समितीचे कार्याध्यक्ष प्रभाकर कुडतरकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करून त्याला सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य एम.डी.खाड्ये, पर्यवेक्षक एन.सी. कुचेकर,श्री.मारुती वळंजू, गुणवंत विद्यार्थ्यांचे पालक प्रविण पाताडे, शिष्यवृत्ती विभागाचे मार्गदर्शक शिक्षक, तसेच विद्यालयाचे शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कासार्डे विद्यालयाचा माजी विद्यार्थी कु.अलंकार प्रविण पाताडे सध्या नवोदय विद्यालय सांगेली ता. सावंतवाडी येथे शिक्षण घेत आहे.या यशाबद्दल कासार्डे विद्यालयाच्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कु.अलंकार याचे विशेष अभिनंदन करून त्याच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

फोटो

कासार्डे:- शिष्यवृत्ती परीक्षेतील यशस्वी कु.अलंकार पाताडे याचा गुणगौरव करताना संस्था पदाधिकारी प्रभाकर कुडतरकर, प्राचार्य खाड्ये, पर्यवेक्षक कुचेकर,श्री. वळंजू, पालक पाताडे व शिक्षकवृंद

प्रतिक्रिया व्यक्त करा