भाजपा कार्यकर्ते पळताभुई करून सोडतील…

भाजपा कार्यकर्ते पळताभुई करून सोडतील…

भारतीय जनता पार्टी राज्य परिषद सदस्य सुरेश सावंत

कणकवली

अलिबाबा आणि 40 चोर यांनी २०१४ च्या निवडणुकी बद्दल किंवा राणे साहेबांच्या पुढील कारकिर्दीबद्दल झाकली मूठ सव्वा लाखाची ठेवावी, अन्यथा मागील निवडणुकीचे सर्व पुरावे गोळा झाले तर त्या चोरांना भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पळताभुई करून सोडतील.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही दिशाहीन झालेले पुढारी आणि आमदारकीचे स्वप्न बघत असलेल्या लोकांचे राणे साहेबांवर प्रसारमाध्यमातून टीका करायचे काम सुरू आहे २०१४ साली जो राणे साहेबांचा पराभव झाला तो, जे लोक राणे साहेबांच्या उजव्या आणि डाव्या बाजूला होते आणि आम्हीच स्वतः राणे साहेब आहोत, अशा पद्धतीने समाजात वावरत होते, अशा लोकांमुळे झाला. त्याच प्रमाणे राणे साहेबांच्या नावावर वाटेल ते कॉन्ट्रॅक्ट घेणे, वाटेल तिथे जमिनी घेणे, तसेच राणे कुटुंबाची बदनामी करणे, आणि त्यांच्या मुलांबद्दल निवडणुकीच्या काळात अपप्रचार करणे, आणि जे राणे कुटुंबाच्या घरामधील सर्व गोष्टी बाहेर जाऊन एकाचे चार करून सांगणे. म्हणजे ज्याप्रमाणे सन १६४१ ते १६६५ या काळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत असणारे विश्वासू लोक विजापूरच्या मोगलांच्या बाजूने गेले आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे खच्चीकरण करण्याचे काम केले. त्याचप्रमाणे २०१४ साली शिवसेनेचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर हे कुडाळ, मालवण मतदारसंघांमध्ये फिरत होते, ते कोणाच्या घरी जेवत होते, कोणाला भेटत होते, कोणाशी फोनवर बोलत होते, त्यांना राणे साहेबांच्या दिनक्रमात बद्दल कोण माहिती देत होते, तसेच राणे साहेब यांच्या प्रचाराच्या सभेचे व्हिडिओ हे दुधवडकर यांना मोबाईलवर कोण देत होते, त्याबद्दलची इत्यंभूत माहिती व पुरावे गोळा करण्याचे काम सुरू झालेले आहे. याबद्दल ची संपूर्ण माहिती थोड्याच दिवसात प्रसारमाध्यमांकडे दिली जाणार आहे. म्हणून भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी लाख फितूर झाले तरी झुंज आम्ही देणार अशी भीष्मप्रतिज्ञा केली आहे हे लक्षात ठेवावे असे भारतीय जनता पार्टी राज्य परिषद सदस्य सुरेश महादेव सावंत यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे
सांगितले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा