You are currently viewing वारसा हक्क प्रकरणी गाव पातळीवर शिबीरांचे आयोजन

वारसा हक्क प्रकरणी गाव पातळीवर शिबीरांचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी

गणेश चतुर्थीच्या सणानिमित्त असंख्य खातेदार जिल्ह्यात येतात. या कालावधीत विशेष बाब म्हणून वारसा हक्क प्रकरणी, वारस तपास नोंदीचे शिबीरं गाव पातळीवर आयोजित करावीत, याबाबतचे पत्र सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी प्रशांत पानवेकर यांनी सर्व तहसिलदारांना पाठविले आहे.

            या पत्रात म्हटले आहे. गाव पातळीवर काम करणाऱ्या तलाठ्यांकडे असलेल्या गाव दप्तरातील एक महत्वाची नोंदवही म्हणजे फेरफार नोंदवही आहे. धारण केलेल्या जमिनीवर निर्माण झालेल्या हक्कांची किंवा हक्कांमध्ये झालेल्या बदलाचे संक्षिप्त वर्णन या नमुन्यात नोंदवायचे असते. जमिनीमध्ये होणारे हक्कबदल हे प्रामुख्याने  खरेदी – विक्री व्यवहार, जमिनीचे वाटणी, गहाणखत, हक्कसोडपत्र, वारसाहक्क, बक्षीसपत्रे, दत्तकपत्र, कर्ज, विहरीची नोंद, भूसंपादन, वननोंदी, कुळवहिवाटीच्या नोंदी केल्या जातात. 7/12 उतारा व इतर अभिलेखात होणारे फेरबदल व त्याबाबत उपाययोजना संदर्भात शआसन निर्णय क्र.लोआप्र – 2007/प्र.क्र.221/ल-6 दि. 30 जुलै 2008 अन्वये व फेरफार नोंदी अर्जाचे सनियंत्रण करण्यासाठी शासन परिपत्रक क्र.संकिर्ण – 2010/प्र.क्र.352/ल-6 दि. 15 जुलै 2010 अन्वये सूचना निर्गमित केलेल्या आहेत.

            प्रामुख्याने गणेश चतुर्थी सणानिमित्त असंख्य खातेदार सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत असतात. उक्त कालावधीत विशेष बाब म्हणून वारसा हक्क प्रकरणी, वारस तपास नोंदीचे शिबीर आयोजित करून व त्याबाबत आवश्यक ती प्रचार प्रसिद्धी करून गाव पातळीवर कार्यवाही करावी व केलेल्या कार्यवाहीचा सविस्तर अहवाल सजा व मंडळ निहाय सादर करावा

प्रतिक्रिया व्यक्त करा

8 − two =