You are currently viewing गरजवंत बाल रुग्णांवर कुडाळ बाल रुग्णालयात २२ व २३ रोजी होणार शस्त्रक्रिया

गरजवंत बाल रुग्णांवर कुडाळ बाल रुग्णालयात २२ व २३ रोजी होणार शस्त्रक्रिया

प्रसिद्ध शल्य चिकित्सक डॉ ओक, डॉ कोठारी करणार विनामूल्य शस्त्रक्रिया

कुडाळ

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गरजवंत बालरुग्णांच्या शस्त्रक्रिया शिबिराचा उपक्रम २२ व २३ एपिल रोजी कुडाळ येथील महिला व बाल रुग्णालयात आयोजित केला आहे. यासाठी प्रख्यात शल्यचिकित्सक डॉ.संजय ओक तसेच मुंबईतील सायन रुग्णालयातील बालरोग शस्त्रक्रिया विभागप्रमुख डॉ.पारस कोठारी आणि त्यांची टीम उपस्थित राहून दोन दिवस गरजवंत लहान मुलांवर विनामूल्य शस्त्रक्रिया करणार आहेत.
या शिबिरात हर्निया, हायड्रोसील, अन-डिसेंडेड टेस्टीस, अपेंडिक्स, हायपोस्पाडिया या रुग्णांना शस्त्रक्रियेचा लाभ मिळणार असून त्यासाठी पूर्व नोंदणी आवश्यक आहे. २२ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता शस्त्रक्रियांना प्रारंभ होऊन २३ एप्रिल रोजी दुपारी बारा वाजेपर्यंत साधारणतः २५ शस्त्रक्रिया संपन्न करण्याचा मानस आहे. आत्तापर्यंत १३ रुग्णांची नोंदणी झालेली असून शिबिराच्या पहिल्या दिवशी एका तासात (दुपारी २.३० ते ३.३०) बाह्यरुग्ण तत्वावर येणा-या आणि निकषांमध्ये बसणा-या बालरुग्णांवर शिबिराच्या दुस-या दिवशी नोंदणीकृत रुग्णांवर शस्त्रक्रिया संपन्न झाल्यानंतर शक्य असल्यास शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी ०२३६२-२२२०४७ किंवा डॉ.अमेय देसाई ९८३३८६९६७१ यांच्याशी संफ साधावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

10 + six =