You are currently viewing जिल्हा कुस्ती निवड चाचणी स्पर्धाचे २७ ला कासार्डेत आयोजन…

जिल्हा कुस्ती निवड चाचणी स्पर्धाचे २७ ला कासार्डेत आयोजन…

कोरोनाचे नियम पाळुन सहभागी होण्याचे जिल्हा कुस्ती संघटनेचे आवाहन

तळेरे : प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या परिपत्रकानुसार सिंधुदुर्ग जिल्हा कुस्ती संघटनाच्या निवड चाचणी स्पर्धा शनिवार दि. 27/02/2021 रोजी कासार्डे हायस्कूलच्या सभागृहात कोरोना साथीच्या पार्श्र्वभूमीवर योग्य ती खबरदारी घेऊन घेतली जाणार आहे. याठिकाणी प्रोढगट पुरूष- (वरिष्ठ गट) व वरिष्ठ महिला गट निवडचाचणी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. सदर स्पर्धेत मर्यादीत खेळाडू संख्या अपेक्षित असल्याने प्रथम नोंदणी करणाऱ्या 30 कुस्तीगीरानी संधी देण्यात येणार आहे वरिष्ठ गट पुरुष:- वजन गट- 57kg. 61kg..65kg.70kg 74kg 79kg 86kg 92kg 97kg व 86 ते 125 kg या गटात होणार आहेत या स्पर्धेत सहभागी कुस्तीगीर हा या जिल्ह्याचा पाच वर्षे रहिवासी व 18 वर्षे पूर्ण झालेला असावा *महिला विभाग वजन गट-:*
50kg 53kg 55kg 57kg 59kg 62kg 65kg 68kg 72kg 76kg पर्यंत या गटात सहभागी.होणारी कुस्तीगीर ही या जिल्ह्य़ातील पाच वर्षे रहिवासी असणे आवश्यक आहे नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क जिल्हा सचिव.श्री.दाजी रेडकर पाट मोबा.9404920009 यांच्याशी संपर्क साधवा असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा कुस्ती संघटनेने केले असून दि. 25/02/2021 सांय.5 पर्यंत अंतिंम नोंदणी होईल याची नोंद जिल्ह्यातील मल्लांनी घ्यावी असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा कुस्ती संघटनाच्या वतीने करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

sixteen − eleven =