You are currently viewing मळेवाड प्रा.आरोग्य केंद्रात डॉक्टरचे रिक्तपद भरण्याच्या आश्वासनामुळे ग्रामस्थांचे उपोषण स्थगित

मळेवाड प्रा.आरोग्य केंद्रात डॉक्टरचे रिक्तपद भरण्याच्या आश्वासनामुळे ग्रामस्थांचे उपोषण स्थगित

सावंतवाडी

मळेवाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात एमबीबीएस डॉक्टरचे पद गेल्या ४ वर्षाहून अधिक काळ रिक्त असून सदर रिक्त पद भरण्यासाठी तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातील इतर समस्यांबाबत सोमवार दिनांक 22 मे ला सकाळी माजी पंचायत समिती सीताराम ऊर्फ बाळा शिरसाट तसेच ग्रामस्थांच्या वतीने मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आमरण उपोषणास करण्यात आले.

यावेळी उपोषणस्थळी सावंतवाडी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ .वर्षा शिरोडकर,तालुका आरोग्य सहाय्यक शंकर परब,मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्र मळेवाडचे डॉ . अदिती ठाकूर, डॉ.व्ही. डी .जोशी,आरोग्य सेवक यु .टी राणे व कर्मचारी यांनी यांनी उपोषण कर्त्याना भेट दिली.मात्र अधिकाऱ्यांना उपस्थितांच्या रोषाला सामोरे जावे लागले.यावेळी डॉ शिरोडकर यांनी एमबीबीएस डॉक्टरचे रिक्त पद भरण्यास असमर्थता दर्शविल्याने उपस्थितांनी जिल्हा आरोग्य विभागाचे अधिकारी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत उपोषणावर ठाम राहण्याचा निर्णय घेतला .यावेळी डॉ .शिरोडकर यांनी जिल्हा आरोग्य विभागाशी संपर्क साधून येथील समस्यांबाबत माहिती दिली असता,जिल्हा बाल संगोपन अधिकारी डॉ. सई धुरी यांनी मळेवाड येथे उपोषणस्थळी भेट देऊन ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेत उपोषण कर्त्यांच्या काही मागण्या मान्य केल्या. तर एम.बी.बीएस डॉक्टरचे रिक्तपद १५ ऑगस्ट पर्यंत भरण्याचे आश्वासन देण्यात आल्याने तसेच सकारात्मक चर्चेमुळे अखेर आजचे आमरण उपोषण तूर्तास स्थगित करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × 5 =