भविष्यातील भाजपाच्या नवीन नेतृत्वाचा उदय…

भविष्यातील भाजपाच्या नवीन नेतृत्वाचा उदय…

संपादकीय….

सिंधुदुर्ग जिल्हा भाजपच्या कार्यकारिणीची बैठक कुडाळ येथे पार पडली. या बैठकीत केंद्रातील भाजपच्या योजना तळागाळापर्यंत पोचविण्यासाठी अनेकांवर जबाबदाऱ्या देण्यात आल्या. भाजपचे जिल्हा चिटणीस महेश सारंग हे सावंतवाडी मतदारसंघातील एक उत्कृष्ट संघटन कौशल्य असलेलं नेतृत्व…आपल्या संघटन कौशल्याने त्यांनी भारतीय जनता पक्षाची सावंतवाडी मतदारसंघात मजबूत बांधणी केलेली आहे. त्यामुळेच गेल्या विधानसभेला भारतीय जनता पक्षाला अपेक्षेपेक्षा जास्त मतदान झाले होते. महेश सारंग यांची कार्यपद्धती आणि संघटन कौशल्य पाहून भारतीय जनता पक्षाने जिल्हा चिटणीस पदाबरोबरच जिल्हा बूथ रचना संयोजक पदाची अतिरिक्त जबाबदारी देत विश्वास दाखविला आहे.
भाजप राज्यात आणि देशात एक नंबर चा पक्ष बनलेला आहे. पुढील तीन वर्षे पक्षासाठी महत्वाची असून येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत, सहकार क्षेत्रातील निवडणुकीत घवघवीत यश मिळविण्याचे पक्षाचे ध्येय आहे. त्यामुळे प्रत्येक बुथ जिंकणे महत्त्वाचे आहे. यासाठीच सर्व बूथ रचना व्यवस्थित करण्यासाठीच महेश सारंग यांच्यासारख्या राजकीय जाण असलेल्या नेत्यांची निवड केलेली आहे.
राज्यात एक कोटीहून जास्त पक्षाचे सदस्य असून समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत पक्ष पोचलेला आहे. अनेक लोक पक्षात दाखल होत आहेत, त्यांना सोबत घेऊन पुढे जायचे असल्याने महेश सारंग यांचा अनुभव आणि पक्षासाठीचे योगदान भाजपच्या संघटनात्मक वाढीसाठी महत्वपूर्ण ठरेल व शतप्रतिशत भाजपा हे उद्दिष्ट देखील साध्य करण्यासाठी महेश सारंग नक्कीच प्रयत्न करतील असा पक्षाला विश्वास आहे. त्यामुळे जिल्हा स्तरावरील महत्वपूर्ण अशी जिल्हा बूथ रचना संयोजक ही जबाबदारी सक्षम खांद्यावर देऊन एकप्रकारे भाजपाने महेश सारंग यांचा सन्मानाच केला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा