You are currently viewing आमदार वैभव नाईक….आपला माणूस.

आमदार वैभव नाईक….आपला माणूस.

संपादकीय…..

आमदार वैभव नाईक यांचा आज वाढदिवस…. संवाद मिडियाकडून त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
कुडाळ मालवण मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक म्हणजे सर्वसामान्यांचे प्रतिनिधी. जनतेच्या हितासाठी अगदी रस्त्यावर उतरून देखील लढा देणारे नेतृत्व.
नेतृत्व करताना जिल्हा पोलीस प्रमुखांनी केलेल्या लाठी हल्ल्यात त्यांना भिडल्यापासून महाराष्ट्रात त्यांची ओळख निर्माण झाली होती.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा आशीर्वाद लाभलेले वैभव नाईक यांनी माजी मुख्यमंत्री नारायण यांचा पराभव केल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात जॉईंट किलर म्हणून ते ओळखले जाऊ लागले.
शिवसेनेचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महत्वाचे युवा नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.
त्यांच्या अविश्वसनीय कामगिरीमुळे उद्धव ठाकरेंचा देखील त्यांच्यावर वरदहस्त आहे.
विधानसभेच्या सभागृहात अभ्यासपूर्ण मुद्देसूद भाषण करत आपल्या मागण्या मान्य करून घेण्यात ते माहीर आहेत.
कोरोनाच्या संकटात देखील स्वतःवर कोरोनाचे संकट आले तरी जनतेच्या कल्याणासाठी ते गावोगावी फिरून लोकांची कामे करत होते. लोकांच्या अडीअडचणी सोडवत होते.
आदित्य ठाकरेंचा देखील वैभव नाईक यांच्यावर प्रचंड विश्वास आहे.
कोकणात आलेल्या पूर संकटात देखील ते भर पुराच्या पाण्यातून लोकांच्या दारापर्यंत पोचत होते.
गेली कित्येकवर्षं प्रतीक्षेत असलेला कुडाळ बसस्थानक एका वर्षात पूर्णत्वास नेत त्यांनी आपल्या कामाची पोचपावती दिली आहे.
खासदार विनायक राऊत यांच्या देखील ते जवळचे मानले जातात.
राजकारणात असताना वेळात वेळ काढून स्थानिक युवकांच्या क्रिकेट सामान्यांची उद्धघाटन असो वा त्यांच्यात क्रिकेटर म्हणून समरस होणे असो, ते मुलांमध्ये मिळून मिसळून आपल्यातील आमदाराला दूर ठेवतात.
कोरोनाच्या काळात व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे देखील पक्षप्रमुखांच्या संपर्कात राहत त्यांनी कोरोना योद्धा म्हणून जनतेसोबत राहिले.
कोकणातील शेतकऱ्यांनी पिकवलेली कलिंगड असो वा इतर पिके,पिकेल ते विकेल या तत्वांवर विश्वास ठेवत ते शेतकऱ्यांसोबत असतात.
गोरगरिबांच्या व्यथा सुद्धा जिथे भेटतील तिथे ऐकत त्यांना त्यातून सोडविण्यासाठी स्वतः प्रयत्न करतात.
वारकरी मेळावा असो वा धार्मिक सामाजिक कार्य असो, वैभव नाईकांचा त्यात सहभाग असतोच.
कांदा महाग झाला तेव्हा जनतेसाठी कमी किमतीत कांदा उपलब्ध करून दिला.
कोकणातील कोणत्याही प्रश्नांसाठी ते कोणाही मंत्र्यांना बेधडक जाऊन भेटतात आणि आपला प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करतात.
केंद्र सरकारच्या विरोधात मोर्चा असो वा आंदोलन वैभव नाईक कधीच मागे राहत नाहीत, ढाण्या वाघासारखे ते त्याचे नेतृत्व करतात.
सर्वसामान्य जनतेसाठी जनतेत मिसळून लढणारा कोकणचा खराखुरा शिवसेनेचा ढाण्या वाघ म्हणजे आमदार वैभव विजय नाईक….
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे युवा नेतृत्व कोकणचा वाघ आमदार वैभव नाईक यांचा आज वाढदिवस….
संवाद मिडियाकडून त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि भावी राजकीय वाटचाल यशस्वी होवो या सदिच्छा..

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × four =