You are currently viewing “पंढरपूर क्षेत्र”

“पंढरपूर क्षेत्र”

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य गीतकार संगीतकार गायक लेखक कवी अरुण गांगल यांची भक्ती पूर्ण काव्यरचना*

 

आषाढी एकादशीचे सर्वांना अभिवादन!

 

*”पंढरपूर क्षेत्र“*

 

पंढरपूर जगांतील श्रेष्ठ तीर्थ स्थान

पुंडलिकाने ठेवले विठूस उभे करून।।ध्रु।।

 

अमोल खजिना दिधला पुंडलिक धन्य

पृथ्वीवरील वैकुंठ दिधले आंदण

दाविले विष्णुपद सर्वांना पुंडलिकानं।।1।।

 

गया रामेश्वर काशी सर्व विठ्ठल चरण

सर्व देव पंढरीत शाश्वत संत जन

घेता दर्शन अहंकार जाई गळून।।2।।

 

वारीत सर्व जाती सुखदुःख विसरून

नाचती आनंदे गळाभेटी घेत रिंगण

पंढरीत जाणवे कणाकणांत स्पंदन।।3।।

 

भीमा चंद्रभागा स्नाने पापे जाती जळून

पंढरीत चाले अखंड नाम संकिर्तन

विठुराया प्रार्थीतो मिळावे आशीर्वचन।।4।।

 

श्री अरुण गांगल.कर्जत रायगड महाराष्ट्र.

पिन 410201.

Cell.9373811677.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × two =