You are currently viewing रंग माझा वेगळा

रंग माझा वेगळा

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच…लालित्य नक्षत्रवेल समूह सदस्य लेखक कवी दीपक पटेकर यांची अप्रतिम स्फुटकाव्य रचना

पाहिला होता का गं कधी..
तू तरी रंग तुझ्या देहाचा?
मी ना देह पाहिला ना रंग…
गुंतलो होतो केवळ…
तुझ्या मनातल्या रंगात…!
स्तब्ध होऊन पाहत होतो…
तुझं अवखळ हसणं..
तुझं नाजूक बोलणं…
तिरप्या नजरेने कटाक्ष टाकणं..
विलक्षण वाटायचं तेव्हा तुझं ते रूप….!
स्वर्गीय भासायचं….
मनाचे सर्व रंग दाखवायचं…
पण…
तुझ्या तनाचा रंग कधी दिसलाच नाही गं…!
ना तो मी कधीही पाहिला…
पाणावलेले असले तरी निरभ्र होते डोळे…
तुझ्या डोळ्यात खोलवर उतरत गेलो…
जसा सांजवेळी रवी उतरतो पाण्यात…
अन् सोडतो आपला तांबूस तपकिरी रंग पाण्यावर…!
मला मात्र…
तुझ्या अंतरंगात सर्वच रंग दिसायचे..
जणू रंगांची रंगपंचमीच…!
त्यांतही होता…
रंग माझा वेगळाच…!

©[दीपि]
दीपक पटेकर, सावंतवाडी
८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा