You are currently viewing बांदा केंद्रशाळेत महामानव डॉ.आंबेडकरांना अभिवादन

बांदा केंद्रशाळेत महामानव डॉ.आंबेडकरांना अभिवादन

विद्यार्थ्यांनी केले एक तास अवांतर वाचन

बांदा

भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३२वी जयंती जिल्हा परीषद बांदा नं.१ केंद्र शाळेत विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी मुख्याध्यापक श्रीकांत आजगावकर यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी विद्यार्थी व शिक्षकांनी आपल्या भाषणातून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्याचा आढावा घेतला.यावेळी विद्यार्थ्यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या वर आधारित भीमगीतांचे गायन केले. यावेळी शाळेतील विद्यार्थी धीरज‌ पटेल‌, गौरव घोगळे यांनी बाबासाहेबांच्या तर तनिष्का देसाई हिने रमाईची लक्षवेधी वेशभूषा साकारली होती.
यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांकडून शाळेच्या वाचनालयातील अवांतर पुस्तकांचे वाचन करून‌ घेण्यात आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचा विद्यार्थी अमोघ वालावलकर हा होता.कार्यक्राचे सुत्रसंचलन शाळेतील विद्यार्थ्यांनी ईश्वरी वावळीये व धनश्री शिंदे यांनी केले.कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी शाळेतील शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.

प्रतिक्रिया व्यक्त करा