You are currently viewing आप’ला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा

आप’ला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा

*’आप’ला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा*

*राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, तृणमूल काँग्रेसचा आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढला*

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

आम आदमी पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला आहे. याशिवाय शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस आणि ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेण्यात आला आहे. यासोबतच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जाही काढून घेण्यात आला आहे. निवडणूक आयोगाने ही माहिती दिली आहे.

दिल्ली, गोवा, पंजाब आणि गुजरात या चार राज्यांतील निवडणुकीतील कामगिरीच्या आधारे आम आदमी पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा देण्यात आल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली. दिल्ली आणि पंजाबमध्ये अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील पक्ष सत्तेत आहे.

*या पक्षांना मिळाला राज्यस्तरीय पक्षाचा दर्जा :-*
नागालैंड मध्ये लोक जनशक्ति पार्टी
त्रिपुरा मध्ये टिपरा मोथा
पश्चिम बंगाल मध्ये रिवोल्यूशनरी सोशलिस्ट पार्टी
मेघालय मध्ये वॉइस ऑफ द पीपुल पार्टी
नागालैंड मध्येे राकांपा
मेघालय मध्ये तृणमूल कांग्रेस

आंध्र प्रदेशमध्ये भारत राष्ट्र समितीचा प्रादेशिक पक्षाचा दर्जा काढून घेण्यात आला आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी गेल्या वर्षीच तेलंगणा राष्ट्र समितीचे नाव बदलून भारत राष्ट्र समिती असे केले होते. याशिवाय उत्तर प्रदेशातील राष्ट्रीय लोकदलाचा राज्य पक्षाचा दर्जा काढून घेण्यात आला आहे.

खरं तर, २०१६ मध्ये, निवडणूक आयोगाने राष्ट्रीय पक्षांच्या पुनरावलोकनासाठी नियम बदलले. आता हा आढावा पाच ऐवजी १० वर्षात घेण्याची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, कोणत्याही राष्ट्रीय पक्षासाठी देशातील किमान चार राज्यांमध्ये त्यांच्या उमेदवारांना सहा टक्क्यांहून अधिक मते मिळणे आवश्यक आहे. लोकसभेत किमान चार खासदारांनी त्याचे प्रतिनिधित्व केले पाहिजे.

आयोगाला २०१९ मध्येच टीएमसी, सीपीआय आणि एनसीपी या राष्ट्रीय पक्षाचा आढावा घ्यायचा होता, परंतु त्यानंतर आगामी राज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोगाने पुनरावलोकन केले नाही. किंबहुना, निवडणूक चिन्ह आदेश १९६८ अंतर्गत पक्षाचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गमावल्यामुळे, पक्ष देशातील सर्व राज्यांमध्ये एकाच चिन्हावर निवडणूक लढवू शकत नाही.

*आता किती राष्ट्रीय पक्ष आहेत?*
१. भारतीय जनता पार्टी (भाजपा)
२. भारतीय राष्ट्रीय कांग्रेस
३. बहुजन समाज पार्टी (बीएसपी)
४. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (सीपीआय)
५. नेशनल पीपुल्स पार्टी (एनपीपी)
६. आम आदमी पार्टी (आप)

आप हा भारतातील सर्वात नवीन राष्ट्रीय पक्ष आहे. या पक्षाला १० एप्रिल २०२३ म्हणजेच आजच राष्ट्रीय पक्षाची मान्यता मिळाली आहे. दिल्लीचे मंत्री आणि आपचे नेते सौरभ भारद्वाज यांनी निवडणूक आयोगाकडून ‘आप’ला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाल्याबद्दल, “एका छोट्या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळणे ही आपल्यासाठी मोठी गोष्ट आहे. ईश्वर आपल्या सर्वांना व आपले राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांना या पक्षाला पुढे नेण्यासाठी आणि संपूर्ण देशाला या पक्षासोबत घेऊन जाण्याची शक्ती देवो.”

आम आदमी पक्षाला सोमवारी राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला. निवडणूक आयोगाकडून हा दर्जा मिळाल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी एक ट्विट करून आनंद व्यक्त केला. त्यात त्यांनी लिहिले की, इतक्या कमी वेळात राष्ट्रीय पक्ष? हा चमत्कारापेक्षा कमी नाही. सर्वांचे खूप खूप अभिनंदन. देशातील करोडो जनतेने आपल्याला येथे आणले आहे. लोकांना आमच्याकडून खूप अपेक्षा आहेत. आज लोकांनी आमच्यावर ही मोठी जबाबदारी दिली आहे. हे परमेश्वरा, आम्हाला ही जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडण्यासाठी आशीर्वाद दे.’

दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अरविंद केजरीवाल मंगळवारी आम आदमी पार्टीच्या कार्यालयात जाणार आहेत. जिथे राष्ट्रीय पक्ष झाल्याचा जल्लोष साजरा केला जाईल. केजरीवाल पक्ष कार्यालयातून देशाला संबोधित करणार असल्याचेही सांगण्यात येत आहे.

दुसरीकडे निवडणूक आयोगानेही इतर अनेक पक्षांना दणका दिला आहे. त्यात तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय कम्युनिस्ट पार्टी यांचा समावेश आहे. आयोगाने त्यांच्याकडून राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेतला. आयोगाने सोमवारी उत्तर प्रदेशातील आरएलडी, आंध्र प्रदेशातील बीआरएस, मणिपूरमधील पीडीए, पुद्दुचेरीतील पीएमके, पश्चिम बंगालमधील आरएसपी आणि मिझोराममधील एमपीसी यांना दिलेला राज्य पक्षाचा दर्जाही रद्द केला.

गुजरात निवडणुकीनंतर आम आदमी पक्षाने दावा केला होता की तो आता राष्ट्रीय दर्जाचा पक्ष आहे, परंतु निवडणूक आयोगाने त्याला दर्जा नाकारल्यानंतर पक्षाने त्याविरोधात कर्नाटक उच्च न्यायालयात अपील केले. त्यावर टिप्पणी करताना न्यायालयाने आयोगाला १३ एप्रिलपर्यंत भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले होते.

*संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल🔹 खोबरे तेल*
*🔹 तीळ तेल🔹 करडई तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप🔹देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*

*जाहिरात लिंक*

———————————————-

 

प्रतिक्रिया व्यक्त करा