You are currently viewing अ.भा.साहित्य परिषद, पुणे यांच्या वतीने ज्ञानकोशकार केतकर पुण्यतिथी साजरी

अ.भा.साहित्य परिषद, पुणे यांच्या वतीने ज्ञानकोशकार केतकर पुण्यतिथी साजरी

*अ.भा.साहित्य परिषद, पुणे यांच्या वतीने ज्ञानकोशकार केतकर पुण्यतिथी साजरी*

अ.भा.साहित्य परिषद, पुणे यांच्यावतीने मराठीतील प्रथम ज्ञानकोशकार डॉ.श्रीधर व्यंकटेश केतकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कमला नेहरू उद्यानातील केतकर स्मारकाजवळ अ.भा.साहित्य परिषदेच्या कार्याध्यक्ष डॉ.अनुजा कुलकर्णी , प्राचार्य श्याम भुर्के (अध्यक्ष), श्री.सुधीर जोशी (केतकरांचे वंशज) यांच्या हस्ते ग्रंथपूजन करण्यात आले.
यावेळेस केतकर चरित्र गीत सामुहिकपणे गाण्यात आले. प्राचार्य श्याम भुर्के म्हणाले ,” डॉ.केतकरांचे चरित्र व साहित्य हे आजही प्रेरणादायक आहे. अविरत कष्ट, प्रचंड ज्ञानलालसा, प्रखर देशभक्ती हे त्यांचे गुण अनुकरणीय आहेत.”
डॉ.अनुजा कुलकर्णी म्हणाल्या,”सतत 15 वर्षाच्या प्रयत्नाने मराठीतील ज्ञानकोश केतकरांनी तयार केला. अमेरिकेत उच्च शिक्षण घेऊनही देशप्रेमापोटी ते भारतात परत आले. येथील समाज ज्ञानी व्हावा, देशप्रेमाने प्रेरित व्हावा असे प्रयत्न त्यांनी केले.
यावेळेस श्री.श्याम सातपुते,जयश्री वैद्य, बाबा ठाकूर, गीता भुर्के इ.उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nineteen + 13 =