भाजप नेत्यांना अर्णबचा एवढा पुळका का?

भाजप नेत्यांना अर्णबचा एवढा पुळका का?

रिपब्लिक टीव्हीचा संपादक अर्णब गोस्वामीला कोकणातील रायगड जिल्ह्यातील काविर हे मुळगाव असलेल्या श्री अन्वय नाईक यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी मुंबई व रायगड पोलिसांनी आज त्याच्या परळ, मुंबई येथील निवासस्थानी अटक केली.या अटकेनंतर भाजपच्या केंद्रीय व राज्यातील नेत्यांनी गळा काढायला सुरुवात केलेली आहे. महाविकास आघाडी सरकारवर टीका करण्यास सुरुवात केलेली आहे.
वास्तविक अर्णब गोस्वामी ह्याने रिपब्लिक चॅनलच्या स्टुडिओ नुतनीकरण प्रकरणी वास्तुविशारद असलेल्या मराठी भाषिक अन्वय नाईक यांना कोट्यवधी रुपयांना फसवले आहे.त्यामुळे वैफल्यग्रस्त परिस्थितीत श्री अन्वय नाईक यांनी २०१८ मध्ये आपल्या काविर, रायगड येथील मुळघरी आत्महत्या केली होती.अर्णब गोस्वामी यांनी आपली आर्थिक फसवणूक केल्यामुळे आपण आत्महत्या करत असल्याचे त्यांनी आत्महत्यापुर्व पत्रात नमुद देखील केलेलं होतं.
मागील काळातील फडणवीस सरकारने हे प्रकरण रितसर चौकशी न करताच दाबून टाकले होते.
आताच्या महाविकास आघाडी सरकारने श्री अन्वय नाईक यांच्या विधवा पत्नी श्रीमती अन्विता नाईक यांच्या विनंतीवरून ही फाईल पुन्हा उघडली आणि तपास सुरू केला,त्या अंतर्गत आज अर्णब गोस्वामीला अटक करण्यात आलेली आहे.
एका गांजेकस,चरसी, चारित्र्यहीन बिहारी अभिनेत्याच्या आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनाच गुन्हेगार ठरवून महाराष्ट्र राज्याच्या सन्माननीय मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करत गेले तीन साडेतीन महिने आपल्या वृत्तवाहिनीवर मिडिया ट्रायल चालविणार्या अर्णबला आज एका मराठी व कोकणी व्यक्तीला आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी अटक केल्यावर भाजपचे केंद्रीय व राज्यातील नेत्यांनी गळा काढण्यास का सुरुवात केली आहे?
आता टीआरपी घोटाळ्यातही तो सापडण्याची शक्यता अधिक आहे.याचाच अर्थ भाजपच्या काळात तो मस्तीत वागत होता.आता हे नाईक प्रकरण गंभीर असल्याशिवाय आणि अर्णबच्या विरोधात पुरेसे पुरावे मिळाल्याशिवाय पोलीस कारवाई करणार नाहीत.आता जे काही होईल ते कोर्टात पण या आधीच भाजप नेत्यांना अर्णबचा पुळका का येतो हे जनतेला कळत नाहीये.
सुशांत सिंग राजपूत व दिशा सालियन आत्महत्या प्रकरणी याच अर्णबच्या रिपब्लिक चॅनलच्या माध्यमातून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे तसेच मुंबई पोलिसांवर अतिशय असंस्कृत भाषेत टिका करणारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजप नेते आता गप्प का? असा सवाल शिवसेना प्रवक्ते डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी केला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा