हनिफ बोबडे यांना उत्कृष्ट तांत्रिक कर्मचारी पुरस्कार.
हनिफ बोबडे यांचे वीज वितरण अधिकारी, कर्मचारी यांच्याकडून अभिनंदन

हनिफ बोबडे यांना उत्कृष्ट तांत्रिक कर्मचारी पुरस्कार.

वीज वितरणचे वरिष्ठ तंत्रज्ञ हनिफ बोबडे यांना उत्कृष्ट तांत्रिक कर्मचारी पुरस्कार. तालुक्यातील सुपूत्र वीज वितरण कंपनीमध्ये गेली अनेक वर्ष प्रामाणिक काम करणारे वरिष्ठ तंत्रज्ञ हनिफ दाऊद बोबडे यांना उत्कृष्ट तांत्रिक कर्मचारी पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. स्वातंत्र्यदिनी हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला. पुरस्कार प्राप्त श्री. हनिफ बोबडे यांचे वैभववाडी तालुक्यात सर्वत्र अभिनंदन केले जाते.

हनिफ बोबडे हे फणसगाव वीज वितरण उपविभाग कार्यक्षेत्रात सध्या वरिष्ठ तंत्रज्ञ पदावर कार्यरत आहेत. ते वैभववाडी तालुक्यातील उंबर्डे गावचे रहिवाशी आहेत. तालुक्यातही वायरमन म्हणून त्यांनी केलेले काम न विसरण्यासारखे आहे. गावात वायरमन मिळावा यासाठी वैभववाडी तालुक्यात अनेक उपोषणे झाली. या उपोषणामध्ये वारंवार ग्रामस्थ हनिफ वायरमन द्या. अशी मागणी करत होते. ग्रामस्थ व वीज ग्राहकांतून मागणी होणे हा देखील हनिफ यांच्यासाठी पुरस्काराच आहे. उत्कृष्ट तांत्रिक कर्मचारी म्हणून मिळालेला पुरस्कार हा त्यांच्या योग्य कामाची दखल आहे. वीज ग्राहकांना दिलेल्या चांगल्या सेवेची पोच आहे. तांत्रिक कर्मचारी संघटनेचे हनिफ बोबडे प्रमुख पदाधिकारी आहेत. प्रशासनामध्ये सांघिक कामाचा त्यांच्याकडे दांडगा अनुभव आहे. पुरस्कार प्राप्त हनिफ बोबडे यांचे वीज वितरण अधिकारी, कर्मचारी यांच्याकडून अभिनंदन केले जात आहे. उंबर्डे सरपंच एस.एम. बोबडे यांनी हनिफ यांचे अभिनंदन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा