संजय देसाई यांचे दुःखद निधन

संजय देसाई यांचे दुःखद निधन

सावंतवाडी

तालुक्यातील डेगवे गावचे सुपुत्र, पुणे पोलीस खात्यातून सेवानिवृत्त झालेले पर्यावरणप्रेमी संजय सहदेव देसाई (६०) यांचे मंगळवारी अल्प आजाराने निधन झाले. डेगवे बाजारवाडी येथील रहिवासी असणारे संजय देसाई हे पुणे पोलीस उपायुक्त कार्यालयात रिपोर्टिंग विभागाकडे होते. त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेऊन आपल्या गावामध्ये शेती, पर्यावरण व फळबागायतीकडे लक्ष दिले होते. ते गेले काही दिवस आजारी होते. आज गोव्यातील रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या दोन्ही मुली माधवी व नम्रता पत्रकार म्हणून कार्यरत आहेत. सिंधुदुर्ग आॅरगॅनिक फेडरेशनचे खजिनदार रणजीत सावंत यांचे ते मेहुणे होत.

प्रतिक्रिया व्यक्त करा