You are currently viewing *फोंडाघाट येथे कुर्ली बाजारपेठ मित्र मंडळाच्या वतीने हनुमान जन्मोत्सव

*फोंडाघाट येथे कुर्ली बाजारपेठ मित्र मंडळाच्या वतीने हनुमान जन्मोत्सव

अनंत पिळणकर, प्रकाश मडवी यांच्या सौजन्याने होणार डबलबारीचा जंगी सामना

फोंडाघाट येथील कुर्ली बाजारपेठ हनुमान मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही हनुमान जन्मोत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा होणार आहे.
हनुमान जन्मोत्सव निमित्त धार्मिक कार्यक्रमा बरोबरच, रात्री डबलबारी भजनाचा जंगी सामना आयोजित करण्यात आला आहे.
पहाटे पाच वाजता गणेश पूजन, सात वाजता हनुमान जन्मोत्सव, दहा वाजता सत्यनारायण महापूजा, दुपारी महाप्रसाद होणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तथा नवीन कुरली विकास समितीचे अध्यक्ष अनंत पिंपळकर, प्रकाश मडवी यांच्या सौजन्याने, कुडाळ येथील सिद्धिविनायक प्रासादिक भजन मंडळ बुवा सिद्धेश परब, गुरुवर्य नारायण वाळवे, पखवाज ओंकार वेंगुर्लेकर व ब्राह्मणदेव प्रसादिक भजन मंडळ बुवा मंगेश खाडये, गुरुवर्य कै. चंद्रकांत कदम, गुरुवर्य गणेश पांचाळ, गुरुवर्य प्रकाश पारकर, पखवाज अक्षय मेस्त्री, तबला साथ अनिल मेस्त्री यांच्यात जंगी डबलबारी सामना होणार आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × three =