You are currently viewing मनसेतर्फे कुडाळ तालुक्यात विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप

मनसेतर्फे कुडाळ तालुक्यात विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप

मनसेतर्फे कुडाळ तालुक्यात विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप

घनश्याम परब यांच्या माध्यमातून उपक्रम; कुणाल किनळेकर यांच्या नियोजनाला यश

कुडाळ :

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते तथा संपर्क अध्यक्ष शिरीष सावंत व संदीप दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली मनसे गोरेगाव विभाग सचिव घनश्याम परब यांच्या माध्यमातून कुडाळ तालुक्यातील विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाचे यशस्वी नियोजन मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी केले.
कलेश्वर विद्यामंदिर, नेरूर येथे सुमारे २५० विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. तसेच नेरूर गोंधयाळे व आंबडपाल येथील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांनाही वह्या वितरित करण्यात आल्या.
या उपक्रमाला मनसे प्र. तालुकाध्यक्ष जगन्नाथ गावडे, मालवण तालुकाध्यक्ष गॅरी अननसिएशन, सर्वेश ठाकूर, सूरज नेरूरकर, अजय जोशी, वल्लभ जोशी, अक्षय जोशी, उमेश परब, अनिकेत ठाकूर यांच्यासह शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रदीप (गोटू) नाईक, देवीदास नाईक, शिवसेना ग्रामपंचायत सदस्य समीर नाईक, प्रसाद गावडे, अमोल शृंगारे, श्रीधर नाईक आदी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देत त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. मनसेच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे पालक व शिक्षकांकडून कौतुक करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा