You are currently viewing मनाचिया गुंता…!

मनाचिया गुंता…!

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा.सदस्य तथा लालित्य नक्षत्रवेल समूह प्रशासक लेखक कवी दीपक पटेकर लिखित अप्रतिम ललितलेख*

*मनाचिया गुंता…!*

*”मन हे विचारांचे वारूळ…*
*दिसे भक्कम बाहेरुनी…*
*जरी आतुनी… पोकळ…*

मन हे विचारांचे वारूळ आहे… वारुळात साप असल्याची एक अनाहूत भीती सतत मनाला सतावत असते… वारुळाला चुकून जरी धक्का लागला तरी साप दुखावला जाईल.. मागून येईल…दंश करेल असं राहून राहून वाटत असतं. चिमुकल्या हातांनी मातीचे कण कण एकत्र करून… लाळेतील ओलाव्याची माया देत मुंग्या मातीचे विशाल घर बनवतात…पहा ना.. किती अलौकिक कारागिरी असते त्यांच्या हाती…! कुठल्या शाळेत इंजिनियरिंग शिकतात त्या…? पण वरून निमुळते…पाणी वारुळाच्या माथ्यावर साचू नये अशी शिखरासारखी अद्वितीय रचना करून एकावर एक शिखर चढवून मुंग्या वारूळ तयार करतात…एकीचे बळ काय असते याचाही प्रत्यय देतात.
*”इमल्यावर इमले चढले… थरावर थर रचिले सुंदर… सुखाचे कण आणुनी बांधिले… मुंग्यानी मातीचे हे देऊळ…!*

कधीतरी एकदा भक्ष्य शोधणारा साप वारुळात घुसतो अन् काही क्षण सापाला वारुळात पाहून आपण मुंग्यांच्या मातीच्या देवळात साप असेल ही भीती मनी बाळगतो… हे मनाचं विचारचक्र नित्य सुरू असतं…
बालमन मात्र निरागस असतं…त्यांना भीती ज्ञात नसते तर अनंत लीला करणाऱ्या बालमनात आनंदाला उधाण येते तेव्हा स्वतःच्या विश्वात रमलेलं बालमन मेंदूने दिलेल्या सूचनेनुसार हसत खिदळत गाणे गाते…
*”असावा सुंदर चॉकलेटचा बंगला…*
*चंदेरी सोनेरी चमचमता चांगला”*
आपली आवड, इच्छा त्यांच्या डोक्यात फेर धरून नाचते अन् तेच डोक्यातील विचार अल्लडपणे गाण्यातून व्यक्त होतात…
वय वाढते तसे विचारही प्रगल्भ होत जातात…असं म्हणतात ना की…
*…भित्यापाठी ब्रह्मराक्षस…!*
खरंच, रित्या मनात भीती असते म्हणून रित्या मनात ब्रह्मराक्षस राहतो… मनात येणारे चित्रविचित्र विचार म्हणजेच ब्रह्मराक्षस…! अन्यथा ब्रह्मराक्षस हा भ्रमच..!
मित्र-मैत्रिणी, सगे सोयरे आदींच्या सहवासात रमलेला… हसरा चेहरा मनातील दुःख, चिंता, भीती कधीच विसरून गेलेला असतो….
परंतु जेव्हा एकांतात असतो…तेव्हा मात्र ह्या दुःख, चिंता, भीती त्याच्या मनावर राज्य करतात…
डोक्यात असंख्य वलये निर्माण होतात…
जणू विचारांचे चक्र अव्याहतपणे सुरू होते. मन विचारांच्या अधीन जाते… आणि दुःख, चिंता आदी मनात साप असल्याचं वावटळ निर्माण करतात….
*”दुःख चिंता आणिक भीती…साप बनुनी मनात राहती…. मुंग्यांचा अधिवास तो आंत… सापाचे नुसतेच वावटळ…मन विचारांचे वारूळ…!”.*
मन खचते तिथे सारंच संपते… खंबीर मन जिंकायची ऊर्जा भरतं अन् ढासळलेलं मन सर्वस्व हरतं… मन जिंकलं की, माणूस जिंकायला वेळ लागत नाही…
डोक्यातून उमटणारे तरंग कित्येकदा सुखद स्वप्नेही दाखवतात…स्वप्नील दुनियेत नेतात…अवकाशात ताऱ्यांसमवेत चमकवतात…मिटल्या नयनांनी निळ्याशार आभाळाची सैर करून आणतात… चांदोमामाच्या अंगणी झुल्यावर झुलवतात… कल्पनेच्या मनोहारी दुनियेत नेतात…
मिटल्या नयन पापणीत ती अलगद येऊन विसावते… हाती कोमल हात देते…गुलाबी गालावर खळी पाडून थोडीशी लाजते…बावरते.. मोगऱ्याचा गजरा कुंतलात माळताच… नाजूकशा स्पर्शाने कण कण रोमांचित होते… अधरांची अधरांशी मैत्री होते..श्वासात श्वास मिसळतात…ती अलगद मिठीत येताच… स्वतःच स्वतःला विसरून जातात…
*विसरून गेलो मी स्वतःला…स्पर्श तुझा होता तनाला…*
*गंधामध्ये गंध मिसळता…नुरते किंमत अत्तराला…*
किती सुंदर असते ना ती भावना…? कल्पनेतील असली तरीही मन मात्र तल्लीन होऊन जगून घेते… क्षणिक सुखात हरवून जाते… स्वर्गसुखच अनुभवते जणू…! जे वास्तवात मिळत नाही ते ते स्वप्नात, कल्पनेत मन देऊन जातं…मन विशाल सागराच्या लाटांवर स्वार होतं… कधी हवेत गिरकी घेतं…!
*मनाने मनाचे कशाला न व्हावे… मनाचे इशारे मनाला कळावे…*
मनात एक असतं अन् डोळे दुसरच दाखवतात… मनाचे ऐकावे की जे दिसतंय त्यावर विश्वास ठेवावा…द्विधा अवस्था होते तेव्हा मात्र प्रश्न पडतो… का बरे, मनाने मनाचे न व्हावे…अन् त्याचे इशारे त्यालाच कळावे…?
असंख्य विचारांचा गुंता घेऊन मन झोपेत सुद्धा जागत राहते…काजवा होऊन अंधाराला प्रकाशमान करण्याचा अयशस्वी प्रयत्न करते…
कधी कधी मनाला झालेला आनंद झोप पापण्यांवर घेऊन उडून जातो…तर कधी मनातील विचारांनी आलेल्या शंका कुशंका पापण्यांना बंद होऊच देत नाहीत… सारे मनाचे खेळ असतात कधी खेळून मजा घेतात…तर कधी मजेमजेत खेळवतात…!
*विचारांना नसते बंधन…*
*नसती बेड्या नसते कुंपण…*
*मुक्तपणे असतो संचार…*
*भरते मन कधी रितेपण…*
माणसांच्या मनातील विचारांना कुठेही निर्बंध नसतात की बंधने…ते स्वैर उधळत असतात…मस्तीत असलेल्या अश्वासारखे…अन् थकल्यावर मनाच्या तळाशी शांत पहुडतात…ध्यानस्थ बसणाऱ्या ऋषीमुनींप्रमाणे…!
असंख्य विचारांनी मन भरून जाते…सैरभैर होते…तर कधी विचारांच्या विळख्यातून मुक्त होत अध्यात्माकडे वळते… ईश्वर भक्तीत लिन होते…शेवटी गुरुचरणी निजधाम शोधते…!
*पाहिले मी सुख माझे… गुरूचरणांशी*
*तीच पंढरी अन् तीच माझी… काशी*

©[दीपी]✍️
दीपक पटेकर, सावंतवाडी
८४४६७४३१९६

 

*संवाद मीडिया*

*👮‍♂️!! खुशखबर! खुशखबर!!👮‍♂️*

*👮‍♂️भारतीय सैन्यदलात (आर्मी, नेवी, एअर फोर्स) अधिकारी होण्याची नामी संधी.*👮‍♀️

*_सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोली येथे 15 दिवसांचे निवासी NDA प्रवेश परीक्षा व SSB interview मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले आहे._*

*_🔸सदर शिबिर १ एप्रिल २०२३ ते १५ एप्रिल २०२३ या कालावधीत इ. ११वी व १२वी (विज्ञान) झालेल्या विद्यार्थ्यांकरिता आहे. सदर प्रशिक्षण शिबिर निवासी असून यामध्ये प्रामुख्याने NDA लेखी परीक्षेचे सखोल मार्गदर्शन व SSB मुलाखत प्रशिक्षण, साहसी खेळ, obstacle training, स्वयं सुरक्षा, रायफल शूटिंग व personality development तसेच सर्व प्रकारचे खेळ यांचा समावेश आहे._*

*_👇खालील लिंक वर क्लिक करून  संबंधित माहितीसह फॉर्म सबमिट करावा_*

https://forms.gle/xxSJxjZSbXXao8hc9

*अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा.*

*📲राजेंद्र गावडे : 9403366229*

*📲 नागेश पांढरे : 9422073840*

*📲Office : 9420195518, 7822942081*

*Advt link …👇*

*————————————–*

*संवाद मीडिया*

*👮‍♂️👮‍♂️सिंधुदुर्ग सैनिक स्कूल, आंबोली👮‍♂️👮‍♂️*

*🔺समर हॉलिडे कॅम्प*🔺

*_🔹The colonel’s Academy for adventure & aero spots आणि सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोलीच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोली येथे उन्हाळी सुट्टीत साहसी व व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण शिबिरे_*

*🔹शिबिर कालावधी – 15 एप्रिल ते 21 एप्रिल 2023 व 22 एप्रिल ते 28 एप्रिल 2023*

*🔹वयोमर्यादा – 10 वर्षावरील मुली व मुले*

*🔹प्रशिक्षणाचे विषय🔹*

*_🔸पिटी, योगा, कराटे, रॅपलिंग, ट्रेकिंग, व्हॅली क्रॉसिंग, रॉक क्लाइंबिंग, फायरिंग, लीडरशिप डेव्हलपमेंट, सेल्फ डिफेन्स, बर्ड अँड प्लांट ऑब्झर्वेशन, स्पोर्ट, ग्रुप डिस्कशन, गेस्ट लेक्चर वगैरे_*

*👇खालील लिंक वर क्लिक करून संबंधित माहिती सर्व फॉर्म सबमिट करावेत*

https://forms.gle/CVGoWJbpoiQ4yeGW8

*अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा.*

*📲राजेंद्र गावडे : 9403366229*

*📲 संजय शिंदे : 9307051091*

*📲Office : 9420195518, 7822942081*

*Advt link …👇*

*————————————–*

प्रतिक्रिया व्यक्त करा