You are currently viewing सावंतवाडी शहरातील वीजेचे धोकादायक खांब बदलण्यास सुरवात…

सावंतवाडी शहरातील वीजेचे धोकादायक खांब बदलण्यास सुरवात…

सावंतवाडी

शहरातील जीर्ण व धोकादायक विज खांब बदलण्याचे काम आज पासून सुरू करण्यात आले. येत्या दिड महिन्याच्या काळात शहरातील सात ते आठ ठिकाणचे पोल बदलण्यात येणार आहे, अशी माहिती वीज वितरण कंपनीचे अधिकारी संदिप भूरे यांनी दिली. दरम्यान सामाजिक बांधिलकी या संघटनेच्या माध्यमातून याबाबतची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार हे खांब बदलण्याचे काम सुरू करण्यात आले आहे, असा दावा संघटनेचे अध्यक्ष रवी जाधव यांनी केला आहे. तसेच हे काम मार्गी लावून धोकादायक खांब बदण्यासाठी सकारात्मक भूमिका घेणार्‍या श्री. भुरे व त्यांच्या टिमचे त्यांनी आभार मानले आहेेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × two =