You are currently viewing फटाक्याची आग लागल्यामुळे सावंतवाडीत चहाची टपरी पेटली…

फटाक्याची आग लागल्यामुळे सावंतवाडीत चहाची टपरी पेटली…

सावंतवाडी

फटाक्याची आग लागल्यामुळे येथील पंचायत समिती कार्यालयासमोर असलेला चहाची टपरी पेटली. मात्र वेळीच स्थानिक नागरीकांनी धाव घेत पाण्याच्या सहाय्याने आग विझविल्याने मोठा अनर्थ टळला. यात संबधित टपरी चालकाचे किरकोळ नुकसान झाले आहे. हा प्रकार गुरूवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडला. बाजूने गणेश विसर्जनासाठी जाणार्‍या काही अतिहौशी युवकांनी त्या स्टॉलवर फटाके फेकले. यात टपरीला लपेटून ठेवलेले प्लास्टीक जळले. त्यामुळे काही वेळातच या टपरीने पेट घेतला. मात्र त्या ठिकाणी असलेल्या स्थानिक युवकांनी मदतकार्यात सहभाग घेत ही आग विझवली. दरम्यान याबाबतची माहिती मिळताच त्या ठिकाणी सावंतवाडी पोलिस आणि पालिकेचा बंब दाखल झाला. परंतु त्यापुर्वीच आग विझविण्यास यश आले. यात संबधित टपरी चालकाचे किरकोळ नुकसान झाले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

16 − one =