You are currently viewing ओरोस जिजामाता चौक येथे टेम्पो चालकाचा ताबा सुटल्याने टेम्पोचा अपघात

ओरोस जिजामाता चौक येथे टेम्पो चालकाचा ताबा सुटल्याने टेम्पोचा अपघात

ओरोस

मुबई गोवा राष्ट्रीय मार्गावरील ओरोस जिजामाता चौक येथे टेम्पो चालकाचा ताबा सुटल्याने त्याने उभ्या असलेल्या दुचाकीला ठोकर दिली. त्यानंतर दुभाजकावर आपटून तो विरुद्ध दिशेच्या रत्यावर गेला. सुदैवाने यात जीवित हानी झाली नाही. दुचाकी चालकाला मार लागला असून टेम्पोचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

सकाळी ६.३० च्या दरम्यान हा अपघात झाला. जीए ०६ टी ४४०१ क्रमांकाचा छोटा टेम्पो कुडाळकडून कसालच्या दिशेने निघाला होता. ओरोस हद्दीतील जिजामाता हॉस्पिटल येथे ठेवण्यात आल्या तात्पुरत्या क्रॉसिंग येथे आला असता त्याचा गाडीवरील ताबा सुटला. त्यामुळे तेथे क्रॉसिंगसाठी थांबलेल्या दुचाकीवर त्याने धडक दिली. त्यानंतर हा टेम्पो दुभाजकावर चढला. दुभाजक पूर्ण क्रॉस करून उलट्या दिशेच्या रस्त्यावर जाऊन कलंडला. यात टेम्पोचे मोठे नुकसान झाले आहे. तर दुचाकी चालकाला दुखापत झाली आहे. दुचाकी चालकाला १०८ रुग्ण वाहिकेतून जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले आहे. सिंधुदुर्गनगरी पोलीस व हायवे पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 + 9 =