You are currently viewing डाॅ.चाकूरकर यांची बदली का झाली…? सुरेश सावंत

डाॅ.चाकूरकर यांची बदली का झाली…? सुरेश सावंत

खातेनिहाय चौकशी करून कारवाई हवी

कणकवली
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या आरोग्य खात्याचे काम चांगले असल्याचे पालकमंत्री उदय सामंत सांगत होते. तसे असेल तर जिल्हा शल्य चिकित्सक चाकूरकर यांचे प्रशासकीय बदली का करण्यात आली? असा सवाल भाजपचे राज्य परिषद सदस्य सुरेश सावंत यांनी उपस्थित केला आहे.
श्री सावंत यांनी म्हटले की, जिल्ह्याचे आरोग्यव्यवस्था चांगली नाही. रुग्णांचे हाल होत आहेत याबाबत आमदार नितेश राणे यांनी आवाज उठवला होता. मात्र पालकमंत्री उदय सामंत यांनी वारंवार जिल्ह्याची आरोग्य व्यवस्था चांगली असल्याची बाजू घेतली होती. तसेच नितेश राणे चुकीचे आरोप करत असल्याची टीका देखील श्री सामंत यांनी केली होती. जिल्ह्याची आरोग्य व्यवस्था जर चांगले होती तर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ चाकूरकर यांची बदली का करावी लागली? याचे उत्तर पालकमंत्र्यांनी द्यावे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.चाकूरकर यांनी आरोग्य व्यवस्थित जो गोंधळ घातला आहे त्याबद्दल त्यांची नुसती बदली करून चालणार नाही तर त्यांची खातेनिहाय चौकशी व्हायला हवी. याबाबतची मागणी राज्याच्या आरोग्य मंत्र्यांकडे करणार असल्याचे सुरेश सावंत म्हणाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nineteen − eighteen =