You are currently viewing शिष्यवृत्ती योजनेचे नवीन अर्ज नोंदणी करणे, जुन्या अर्जांचे नुतनीकरण करण्यासाठी 30 एप्रिल पर्यंत मुदतवाढ

शिष्यवृत्ती योजनेचे नवीन अर्ज नोंदणी करणे, जुन्या अर्जांचे नुतनीकरण करण्यासाठी 30 एप्रिल पर्यंत मुदतवाढ

– सहायक आयुक्त संतोष चिकणे

सिंधुदुर्गनगरी

सन 2022-23 करीता भारत सरकार शिष्यवृत्तीसाठी महाविद्यालयातील ज्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज अद्याप नोंदणी झालेली नाहीत, अशा अनु. जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजनेचे नवीन अर्ज नोंदणी करणे व जुन्या अर्जांचे नुतनीकरण करण्यासाठी  महाविद्यालय स्तरावरील प्रलंबित अर्ज मंजुरीसाठी  पाठविण्यासाठी दि.30 एप्रिल अखेर मुदतवाढ देण्यात आलेली आहे. अशी माहिती समाज कल्याण विभागचे सहायक आयुक्त संतोष चिकणे यांनी दिली .

            भारत सरकार शिष्यवृत्ती अर्ज भरण्याची  प्रक्रीया आपले सरकार पोर्टलवरील https://mahadhtmahait.gov.in  या संकेतस्थळावर सुरु आहे. विहित वेळेत विद्यार्थ्यांचे अर्ज भरुन घेण्याची जबाबदारी संबंधित महाविद्यालयाची आहे.  महाविद्यालयस्तरावर प्रलंबित असलेले अर्जांची छाननी करुन परिपूर्ण अर्ज मंजुरीसाठी दि. 30  एप्रिल  पर्यंत कार्यवाही करावी.ज्‍या विद्यार्थ्‍यांचे अर्ज अद्याप नोंदणी झालेली नाहीत. अशा विद्यार्थ्‍याचे अर्ज संबंधित महाविद्यालयानी नोंदणी करुन  शिष्‍यवृत्‍ती अर्ज मंजुरीसाठी पाठविण्‍यात यावे. शिष्‍यवृत्‍ती अर्ज भरणे व मंजुरीसाठी पाविण्‍याची दि. 30 एप्रिल 2023 ही अंतिम मुदत असल्‍याने या योजनेपासून मागासवर्गीय विद्यार्थी वंचित राहिल्‍यासयास संबंधित महाविद्यातील प्राचार्य जबाबदार राहतील असे पत्रकात नमूद आहे.

            शिष्‍यवृत्‍ती योजनेचे नवीन अर्ज नोंदणी करणे व जुन्‍या अर्ज नुतनीकरण करण्‍याबाबत समस्‍या अद्भवल्‍यास अधिक माहितीसाठी समाज कल्‍याण कार्यालय दूरध्‍वनी क्र.02362- 228882 येथे संपर्क साधावा, असे आवाहन समाज कल्याण विभगाचे सहायक आयुक्त संतोष चिकणे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा