You are currently viewing निसर्गमित्र तर्फे पक्षी सप्ताह निमित्त पक्षी व पर्यावरण संवर्धन यावर प्रतिज्ञा लिखाण स्पर्धा….

निसर्गमित्र तर्फे पक्षी सप्ताह निमित्त पक्षी व पर्यावरण संवर्धन यावर प्रतिज्ञा लिखाण स्पर्धा….

निसर्गमित्र तर्फे पक्षी सप्ताह निमित्त
पक्षी व पर्यावरण संवर्धन यावर प्रतिज्ञा लिखाण स्पर्धा दि.०५ ते दि.१२ नोव्हें २०२० पक्षी सप्ताह निमित्त निसर्गमित्र तर्फे ‘पक्षी व पर्यावरण संवर्धन यावर प्रतिज्ञा ’ लिखाण स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली असल्याची माहिती पक्षीमित्र शिल्पा व राजेंद्र गाडगीळ यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलतांना
दिली.
हा अभिनव उपक्रम घेण्यामागील उद्देश स्पष्ट करतांना ते म्हणाले की पक्षी संवर्धन व जतन यांचे महत्व लक्षात यावे. तसेच त्यांचा अधिवास सुरक्षित राहावा या साठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा ही या उपक्रमा मागील भूमिका आहे. हे लक्षात घेऊन सर्व स्पर्धकांनी ही प्रतिज्ञा तयार करावयाची आहे. प्रतिज्ञा किमान ६ ते जास्तीत जास्त ८ ओळी मध्ये लिहून व्हॉट्सॲपवर
फोटो काढून पाठवायची असल्याचे त्यांनी सांगितले.
पक्षीमित्र शिल्पा व राजेंद्र गाडगीळ म्हणाले हा पक्षी सप्ताह मागील वर्षाप्रमाणे या वर्षी ही
निसर्गमित्र तर्फे साजरा करण्यात येणार आहे. पक्षी महर्षी मारुती चितमपल्ली यांचा जन्मदिन सप्ताहास सुरवात होणार असून ते पक्षी शास्त्रज्ञ स्व. डॉ.सालीम अली यांच्या
जयंती दिनी समारोप होईल.या वर्षीचे वैशिष्ठ्य म्हणजे महाराष्ट्र शासनाने पक्षी सप्ताह
साजरा करण्याचा जी.आर.काढला आहे. ही खूप आनंदाची गोष्ट आहे.भारतात महाराष्ट्र राज्य
असा जी. आर. काढणारे पाहिले राज्य आहे. या स्पर्धेत निसर्गमित्र बंधू, भगिनींनी आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन पक्षीमित्र शिल्पा व राजेंद्र गाडगीळ यांनी केले आहे.
या स्पर्धेचा निकाल गुरवार दि.१२/११ /२०२० रोजी जाहीर करण्यात येईल.  प्रथम, व्दितीय, तृतीय व उत्तेजनार्थ दोन याप्रमाणे क्रमांक काढून विजेत्यांना प्रमाणपत्र देण्यात येईल.
स्पर्धेचा विषय, नियम व अटी :- स्पर्धा सर्वासाठी खुली आहे.
१ – विषय – पक्षी व पर्यावरण संवर्धन यावर प्रतिज्ञा लिखाण
२ – शब्द मर्यादा – कमीतकमी ६ व जास्तीत जास्त ८ ओळी
३ – पाठवण्याची मुदत – रविवार दि.०८ नोव्हेंबर २०२० पर्यंत
४ – त्याच पानाच्या वरच्या बाजूला पक्षी सप्ताह प्रतिज्ञा स्पर्धा २०२० असा उल्लेख करावा.  तसेच खालच्या ओळीवर स्पर्धकाचे पूर्ण नांव, गावाचे नांव व व्हॉट्सॲप
मोबाईल क्रमांक लिहावा.( पानाच्या मागील बाजूवर लिहू नये)
५ – या प्रतिज्ञापत्राचा फोटो काढून खाली दिलेल्या व्हॉट्सॲप क्रमांकावर
पाठवावा:- मो.क्र.८९९९८०९४१६
७ – हा फोटो स्पष्ट, अक्षरे नीट दिसतील असा असावा.
८ – प्रथम, व्दितीय, तृतीय व उत्तेजनार्थ हे क्रमांक मिळवणाऱ्या विजेत्या स्पर्धकांना
त्यांची प्रमाणपत्र त्यांनी दिलेल्या व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठवण्यात येतील.
९ – स्पर्धेचा निकाल – गुरवार दि.१२ नोव्हेंबर २०२० लावण्यात येईल

प्रतिक्रिया व्यक्त करा

three + 1 =