You are currently viewing फोंडाघाटची अवनी परब ठरली ब्राँझ पदकाची मानकरी!

फोंडाघाटची अवनी परब ठरली ब्राँझ पदकाची मानकरी!

हरिद्वार येथे राष्ट्रीय स्टुडंट्स ऑलिम्पिक कॅरम स्पर्धेचे आयोजन

 

कणकवली :

कणकवली फोंडाघाट येथील उत्तराखंड हरिद्वार येथे आयोजित ९ व्या राष्ट्रीय स्टुडंट्स ऑलिम्पिक कॅरम स्पर्धेत  अवनी अविनाश परब हीने ब्राँझ पदक पटकावले आहे.

मूळची मुंबई डोंबिवली येथे आयईएस चंद्रकांत पाटकर या विद्यालयात नववीत शिकत असलेली अवनी परब हीने यापूर्वी शहरी आणि जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेत अनेक बक्षिसे मिळविली आहेत. या राष्ट्रीय स्पर्धेनंतर अवनी परब हीची निवड आंतरराष्ट्रीय टीम मध्ये झाली आहे. अवनी परब हिस मेडल देऊन सन्मानित करण्यात आले. या यशाचे श्रेय आई वडील आणि प्रशिक्षक विवेक म्हात्रे, प्रदीप साटम, मीनल लेले यांना आहे. अवनी हीचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × 5 =