सार्वजनिक बांधकामच्या लेखीपत्रानंतर तेरवण येथील उपोषण मागे

सार्वजनिक बांधकामच्या लेखीपत्रानंतर तेरवण येथील उपोषण मागे

दोडामार्ग

नागनाथ मंदिर मेढे ते तेरवण अशा रस्त्याचे काम अनेकवेळा निवेदन देऊनही अजून सुरू करण्यात आले नाही, रस्त्याच्या मोऱ्याचें बांधकाम करण्यासाठी १० लाख रुपये मंजूर होऊन व कार्यारंभ मिळूनही अजून कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली नाही आदी अनेक प्रश्नासाठी तेरवण मेढे माजी उपसरपंच प्रवीण गवस व ग्रामस्थानी आज नियोजित रस्त्यावर उपोषणास सुरुवात केली होती मात्र उशिरापर्यंत कोणताही तोडगा निघू शकला नव्हता, यावेळी शिवसेना दोडामार्ग तालुकाप्रमुख व प स सदस्य बाबुराव धुरी यांनी भेट देऊन या उपोषण कर्त्यांशी चर्चा केली होती तसेच बांधकाम विभागाशी दूरध्वनीवरून संपर्क साधून या उपोषण कर्त्यांच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या होत्या. जोपर्यंत बांधकाम चे अधिकारी याठिकाणी येऊन ठोस निर्णय किंवा लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत उपोषण मागे न घेण्याचा निर्णय घेतला होता. उपोषण कर्त्यांच्या भावना तीव्र होत्या, या रस्त्यासदर्भात वस्तूस्थिती लोकांना समजावी, योग्य वेळेत काम सुरू न केल्याने रस्ता वाहून गेल्याचेही त्यांचे म्हणणे होते.
अखेर उशिरा उप अभियंता बांधकाम विभाग सावंतवाडी यांचे लेखी पत्र प्राप्त झाल्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले या पत्रात मोऱ्याचे बांधकाम १५ दिवसात सुरू करण्यात येईल, खंडीकरण व डांबरीकरण करणे हे काम निविदा प्रक्रियेत आहे ही प्रक्रिया पूर्ण होताच कार्यारंभ करण्यात येईल असे म्हटले आहे, हे पत्र मिळताच उपोषण कर्त्यांनी उपोषण मागे घेतले.

प्रतिक्रिया व्यक्त करा