You are currently viewing २ एप्रिलला नेतर्डे येथे भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

२ एप्रिलला नेतर्डे येथे भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

बांदा :

रोटरी क्लब ऑफ बांदा यांच्या वतीने प्राथमिक उपकेंद्र नेतर्डे येथे ६० वर्षावरील १११ पुरुष व महिलांची मोफत रक्त तपासणी करण्यात आली. अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान गोवा, स्वामी विवेकानंद संस्था कडशी-मोपा व रोटरी क्लब बांदा यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार २ एप्रिलला उपकेंद्र नेतर्डे येथे सकाळी १० ते दुपारी १.३० या कालावधीत भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

आरोग्य शिबिराच्या पार्श्वभूमीवर मोफत रक्त तपासणी करण्यात आली. यावेळी रोटरी क्लबचे उपाध्यक्ष तथा माजी सभापती प्रमोद कामत, स्थानिक लोकप्रतिनिधी, बांदा आरोग्य केंद्राच्या प्रयोगशाळा परिचारिका श्वेता वराडकर आदी उपस्थित होते. रक्त तपासणी शिबिराला गावातील ग्रामस्थांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.

यावेळी उपस्थित सर्वांनी २ एप्रिल रोजी होणाऱ्या मोफत आरोग्य शिबिराला सहभागी होण्याचे आवाहन प्रमोद कामत यांनी यावेळी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fourteen + 18 =